पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी; महाराष्ट्रात २१ जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 12:04 IST2025-02-15T11:53:26+5:302025-02-15T12:04:49+5:30
उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीद्वारे करणे आवश्यक आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी; महाराष्ट्रात २१ जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज?
Government Job: भारतीय डाक विभागामार्फत अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी (२१ रिक्त पदे) भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी ०३ मार्च, २०२५ पर्यंत व त्यापूर्वी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, असं आवाहन नवी मुंबई विभाग, वाशीचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांनी केलं आहे.
उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीद्वारे करणे आवश्यक आहे. कोणत्याही अन्य माध्यमाद्वारे आलेले व व्यक्तिश: आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अधिसूचने मध्ये नमूद केलेल्या सूचनांनुसार शुल्क भरणे आवश्यक आहे.
"पोस्ट विभाग उमेदवारांना कोणताही फोनकॉल करत नाही. संबंधित प्राधिकरणाद्वारेच उमेदवारांशी, पत्रव्यवहार, केला जातो. उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती, नोंदणी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी इतरांसमोर उघड करू नयेत आणि कोणत्याही अवैध फोन कॉल्सपासून सावध राहावे, अधिक माहितीसाठी www.indiapostgdsonline.gov.in संकेस्थळास भेट द्यावी. नियम व अटी, वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत," अशी माहितीही नवी मुंबई विभाग, वाशीचे वरिष्ठ अधीक्षक यांनी दिली आहे.