शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही XXX झालोय..." राज ठाकरेंच्या विधानावर जितेंद्र आव्हाडांनी ऑन कॅमेरा काय केले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 13:16 IST

भारतात प्रत्येकाला त्यांचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. किंबुहुना मी राज ठाकरेंचं अभिनंदन करेन. अशाप्रकारे हिंमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे. आपल्या मनातलं बोलायला हिंमत लागते असं त्यांनी म्हटलं. 

मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावरून गंगा नदीच्या अस्वच्छतेवर भाष्य केले. राज यांच्या विधानावरून भाजपासह शिवसेनेसारख्या संघटनांनी आक्षेप घेत त्याचा समाचार घेतला. मात्र राज ठाकरे जे बोलले, ते बोलायला धाडस लागते, आम्ही XXX झालोय, षंढ झालोय, हे बोलायलाही घाबरतो, नको आपल्या मागे लागतील परंतु राज ठाकरे जे बोलले त्यांना सलाम असं सांगत जितेंद्र आव्हाडांनी त्यांचं कौतुक केले.

राज यांच्या विधानावर माध्यमांनी जितेंद्र आव्हाडांना प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी जितेंद्र आव्हाडांनी राज यांची मिमिक्री करत म्हणाले की,  राज ठाकरेंनी जे विधान केले, जी नकल केली ते आम्ही केले असते तर आतापर्यंत आमच्या घरावर मोर्चे, दगडफेक झाली असती. आम्ही देशद्रोहीही ठरलो असतो. राज ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केले. भारतात प्रत्येकाला त्यांचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. किंबुहुना मी राज ठाकरेंचं अभिनंदन करेन. अशाप्रकारे हिंमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे. आपल्या मनातलं बोलायला हिंमत लागते असं त्यांनी म्हटलं. 

तसेच आम्ही कदू, XXX, षंढ झालोत, आम्ही हे बोलायलाही घाबरतो, नको नको उगाच आपल्या मागे लागतील. राज ठाकरे मनात आहे ते बिनधास्त बोललेत. ते बोलले ते अनेक भारतीयांच्या मनात आहेत. राज ठाकरेंच्या डेरिंगला माझा सलाम आहे. बाकी मला यात काही बोलायचे नाही असं जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया देत सॅल्यूट देतानाची अ‍ॅक्शन माध्यमांसमोर केली. 

राज ठाकरे मविआत सहभागी होणार?

दरम्यान, राज ठाकरे मविआत सहभागी होणार का या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना खोचक टोला लगावला. तुम्ही स्वप्नरंजन करत राहावे, पत्रकाराचं काम स्वप्न पाहणे हे आहे. तुमच्या स्वप्नावरच महाराष्ट्र चालतो, तुम्ही स्वप्न पाहात राहा. परंतु राज ठाकरे यांनी जे विधान केले, ते करण्याची हिंमत दाखवली त्यासाठी राज ठाकरेंना मानाचा मुजरा असं आव्हाडांनी सांगितले.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

मनसेचा वर्धापन मेळावा पिंपरी चिंचवड येथे पार पडला. त्यात राज ठाकरे म्हणाले की, कुंभमेळ्याला जाऊन आल्यावर बाळा नांदगावकर यांनी मला कमंडलूमधील पाणी दिले. ते म्हणाले, पिणार का? मी नाही म्हटले. देशातील एकही नदी स्वच्छ नाही, तरीही आम्ही नदीला माता म्हणतो. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही असं परखड मत त्यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेKumbh Melaकुंभ मेळाBJPभाजपा