JEE Main Result 2025: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! जेईई परीक्षेत राज्यातील तिघांना १०० टक्के गुण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 11:16 IST2025-04-19T11:13:35+5:302025-04-19T11:16:38+5:30
JEE Main Result 2025 Toppers List: जेईई परीक्षेत एकूण २४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत, ज्यात महाराष्ट्रातील ३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

JEE Main Result 2025: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! जेईई परीक्षेत राज्यातील तिघांना १०० टक्के गुण
नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएचा जेईई मेन्स सेशन-२ चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत देशभरातून एकूण २४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत, ज्यात महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या परीक्षेला बसलेले विद्यार्थ्यी jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल तपासू शकतात.
ही परीक्षा जानेवारी आणि एप्रिलमध्ये दोन सत्रांमध्ये घेण्यात आली होती. यावर्षी एकूण १५ लाख ३९ हजार ८४८ उमेदवारांनी अर्जक केला होता. त्यापैकी १४ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थी परीक्षेला बसले. यातील २ लाख ५० हजार २३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं एप्रिल सत्राची अंतिम उत्तरपत्रिका अधिकृत वेबसाइटवर अपलोड केली आहे.
या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणाऱ्यांमध्ये सर्वाधिक ७ विद्यार्थी राजस्थानचे आहेत. महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रेदश येथील प्रत्येकी तीन विद्यार्थी या यादीत आहेत. तर, पश्चिम बंगाल, दिल्ली गुजरात येथील प्रत्येकी दोन आणि आंध्र प्रदेश, कर्नाटक येथील दोन विद्यार्थ्यांचाही या यादीत समावेश आहे.
परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी
१) मोहम्मद अनस - राजस्थान
२) आयुष सिंघल - राजस्थान
३) आर्किसमन नंदी - पश्चिम बंगाल
४) देवदत्त माझी - पश्चिम बंगाल
५) आयुष रवी चौधरी– महाराष्ट्र
६) लक्ष्य शर्मा - राजस्थान
७) कुशाग्र गुप्ता - कर्नाटक
८) हर्ष गुप्ता - तेलंगणा
९) आदित प्रकाश भेगडे – गुजरात
१०) दक्ष - दिल्ली
११) हर्ष झा - दिल्ली
१२) रजित गुप्ता - राजस्थान
१३) श्रेयस लोहिया - उत्तर प्रदेश
१४) सक्षम जिंदाल - राजस्थान
१५) सौरव - उत्तर प्रदेश
१६) वनगाला अजय रेड्डी - तेलंगणा
१७) सानिध्या सराफ– महाराष्ट्र
१८) विशाद जैन - महाराष्ट्र
१९) अर्णव सिंग - राजस्थान
२०) शिवेन विकास तोष्णीवाल – गुजरात
२१) कुशाग्र बांघा – उत्तर प्रदेश
२२) साई मनोगना गुठीकोंडा – आंध्र प्रदेश
२३) ओम प्रकाश बेहरा – राजस्थान
२४) बानी ब्रता माझी - तेलंगणा