शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी भिडेंना कोरेगाव-भीमा प्रकरणात जयंत पाटलांमुळे क्लीनचिट : प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 14:13 IST

Prakash Ambedkar : नाशिकमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस अधिकाऱ्यांना एका ठराविक विचारसरणीचे लोकच दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असतात अशी शिकवण दिली जाते. दुसऱ्या बाजूच्या लोकांबद्दल ते बोलत नाहीत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

पुणे : कोरेगाव - भीमा हिंसाचार प्रकरणात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यामुळेच क्लीनचिट मिळाली, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला. ज्या तपास अधिकाऱ्याने हे क्लीनचिट दिले आहे, त्याने सुप्रीम कोर्टात दिलेले प्रतिज्ञापत्र वाचलेले नाही. त्यात सुप्रीम कोर्टाला असे कळवले आहे की, संभाजी भिडे आणि एकबोटे दोषी आहेत. त्यामुळे तपास अधिकाऱ्याने कुणाच्या तरी सांगण्यावरुन क्लीनचिट दिली आहे. तपास अधिकाऱ्याने सुप्रीम कोर्टात जे प्रतिज्ञापत्रात दिले आहे. त्यामध्ये भिडेंना दोषी ठरवले आहे. आता भूमिका बदलल्यास तो तपास अधिकारीच विटनेस बॉक्समधे येईल. त्या अधिकाऱ्याला ग्रामीण पोलिसांनी सुप्रीम कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा सामना करावा लागेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते. 

तपास अधिकारी संभाजी भिडे यांना क्लीनचिट देण्याच्या निष्कर्षापर्यंत कसा पोहोचला? न्यायालयात संभाजी भिडे यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला विरोध होईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे संभाजी भिडे यांच्या पाया पडतानाचे छायाचित्र आहे. त्यामुळे लक्षात घेतले जावे की सूत्रं कुठून हलत असतील. तर हा सगळा घोटाळा आहे आणि त्याची कागदपत्रे माझ्याकडे आहेत, असे शरद पवारांनी म्हटले होते. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुफळी बाहेर येत आहे, असेही आंबेडकर यांनी म्हटले.

याचबरोबर, भाजपचाही यात पूर्ण रोल आहे. इथल्या कुठल्याही यशस्वीपणे सत्ता राबवायची असेल तर ज्या टेरेरिस्ट ऑर्गनायझेशन आहेत त्यांचा परिचय पोलिसांना करुन दिला पाहिजे. नाशिकमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस अधिकाऱ्यांना एका ठराविक विचारसरणीचे लोकच दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असतात अशी शिकवण दिली जाते. दुसऱ्या बाजूच्या लोकांबद्दल ते बोलत नाहीत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

"प्रस्थापित पक्ष ओबीसींना आरक्षण मिळू देणार नाहीत"महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्ष ओबीसींना आरक्षण मिळू देणार नाहीत. जाणीवपूर्वक इम्पीरिकल डेटा गोळा केला जात नाही. ओबीसी आणि बहुजन समाजाने राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद न देऊन ते शहाणे होत असल्याच दाखवून दिले आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आरक्षण विरोधी आहेत, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरJayant Patilजयंत पाटीलBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार