Jayant Patil:एकदा 'अशीही बनवाबनवी' चित्रपट पहाच; जयंत पाटलांचा इस्त्रायलच्या अधिकाऱ्याला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 21:45 IST2022-03-29T21:44:39+5:302022-03-29T21:45:44+5:30
आज इस्त्रायल दुतावासातील अधिकारी कोबी शोशानी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोबी यांना 'अशीही बनवाबनवी' सिनेमा पाहण्याचा सल्ला दिला.

Jayant Patil:एकदा 'अशीही बनवाबनवी' चित्रपट पहाच; जयंत पाटलांचा इस्त्रायलच्या अधिकाऱ्याला सल्ला
मुंबई- 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटाविषयी माहिती नसेल, असा क्वचितच कुणीच असेल. या चित्रपटातील 'इस्रायलचा' सीन सर्वात लोकप्रिय आहे. दरम्यान, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि थेट इस्रायलच्या दुतावासातील एका अधिकाऱ्यालाच हा चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला. आज जयंत पाटील आणि इस्रायलच्या दुतावासातील अधिकाऱ्याची भेट झाली, यावळी पाटलांनी त्यांना हा चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला.
जगभरातील लोकांचे भारतीय सिनेसृष्टीवर असलेले प्रेम काही नवे नाही. भारतीय सिनेसृष्टीवर प्रेम करणारा माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला सापडेलच. अशाच भारतीय सिनेसृष्टीची भुरळ पडलेले इस्त्रायल दुतावासातील अधिकारी कोबी शोशानी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली.
Haha, I will surely make time to watch the movies you suggested. Your love for Bollywood films is indeed fascinating.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 29, 2022
I recommend you to try Marathi films also. Sharing a clip from an iconic comedy - ‘Ashi Hi Banwa Banwi’. It has a reference of Israel as well. :) https://t.co/s84LETVbXjpic.twitter.com/rP3I7FQlJr
कामानिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांची भेट घेण्यासाठी आलेल्या कोबी शोशानी यांनी जयंतराव पाटलांना भारतीय सिनेमाबाबत असलेल्या प्रेमाबद्दल सांगताच जयंतराव पाटलांनी त्यांना काही चित्रपट पाहण्याचा सल्ला दिलाच. शिवाय दिलखुलास स्वभाव असणार्या जयंतराव पाटील यांनी यावर दाद दिली नाहीत तर ते जयंतराव कसले ! जयंतरावांनी कोबी यांना 'अशीही बनवाबनवी' हा मराठी सिनेमा पाहण्याचा सल्ला देतानाच या मराठी सिनेमात इस्त्रायलचा उल्लेख असल्याचेही नमूद केले.