शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील लवकरच अजितदादांच्या राष्ट्रवादीत? अमोल मिटकरी म्हणाले, "योग्य वेळी निर्णय घेतील..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 17:32 IST

जयंत पाटील लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असतील, असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. 

मुंबई : आज राहुल नार्वेकर यांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. यावेळी त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सभागृहात बोलताना जयंत पाटील यांनी योग्य वेळी योग्य निर्णय असा आपल्या पक्षाचा नियम असल्याचे म्हटले. त्यावरून आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे नेते अमोल मिटकरी भाष्य केले आहे. जयंत पाटील लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असतील, असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. 

जयंत पाटील म्हणाले योग्य वेळी योग्य निर्णय घेणार. मधली ओळ अशी आहे की, लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत ते असतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवार, म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय ते घेणार आहेत. गेल्या वेळच्या महायुतीच्या सरकारच्या 10 कॅबिनेट बैठका झाल्या होत्या. त्याचवेळी अजित पवारांनी जयंत पाटलांना बोलावलं होतं. मागच्या वेळी त्यांनी प्रयत्न केले होते, पण ती योग्य वेळ नव्हती. त्यांना आवाहन करायला मी मोठा नाही, असे अमोल मिटकरी म्हणाले.

याचबरोबर, जयंत पाटील यांच्यासाठी देवगिरीची दार अखंड खुली आहेत. त्यांच्यासारखा नेता महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो, तो आम्हालाच काय भाजपला पण हवाहवासा वाटतो. ड्राईव्हिंग सीट त्यांच्यासाठी राखीव ते उत्तम चालक आहेत, वेळ पडली तर स्टेरिंग त्यांच्या हाती देऊ. रथ कोणी हाकलावा हा नंतरचा भाग. मात्र, जयंत पाटील यांचे आजचे विधान महाराष्ट्राला खूप काही सांगून जाणारं आहे, असे सूचक विधान अमोल मिटकरी यांनी केले आहे.

सभागृहात नेमंक काय म्हणाले जयंत पाटील?  आज राहुल नार्वेकर यांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. यावेळी त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर जयंत पाटील यांनी भाषण केले. यावेळी विधानसभा अध्यक्षांचा मान किती मोठा असतो, याबाबत ते बोलत असताना म्हणाले की, मी 90 साली पहिल्यांदा अध्यक्ष झालो, असे म्हणाले. त्याचवेळी अजित पवार म्हणाले की, तुम्ही अध्यक्ष नाही आमदार झालात, तेव्हा जयंत पाटील यांनी सारवासारव करत म्हटलं की, बघा अजितदादांचं माझ्यावर किती लक्ष आहे, तेव्हा अजित पवार लगेच म्हणाले की, माझं तुमच्यावर लक्ष आहे, पण तुम्ही कधी प्रतिसाद देतांय, तेव्हा जयंत पाटील म्हणाले की, दादा आपल्या पक्षाचा एक नियम आहे, योग्य वेळी योग्य निर्णय. दरम्यान, जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAmol Mitkariअमोल मिटकरी