शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटलांची तब्बल साडेनऊ तास चौकशी; ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 06:34 IST

ईडीच्या कार्यालयातून चालतच पाटील राष्ट्रवादीच्या कार्यालयात गेले. सोमवारी सकाळी पावणेबाराच्या दरम्यान ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग ॲण्ड फायनॅन्शियल सर्व्हिसेस (आयएल ॲण्ड एफएस) या कंपनीत झालेल्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी ईडीने (सक्तवसुली संचालनालय) साडेनऊ तास चौकशी केली. रात्री साडेनऊच्या सुमारास ते ईडी कार्यालयाबाहेर आले. त्यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घोषणाबाजी करीत होते.    

ईडीच्या कार्यालयातून चालतच पाटील राष्ट्रवादीच्या कार्यालयात गेले. सोमवारी सकाळी पावणेबाराच्या दरम्यान ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले. उपलब्ध माहितीनुसार, २००८ ते २०१४ या कालावधीमध्ये आयएल ॲण्ड एफएस समूहातील काही कंपन्यांनी सरकारकडून पायाभूत सुविधांचे काम प्राप्त केले होते आणि ते काम करण्यासाठी उपकंत्राटदार नेमले. 

या उपकंत्राटदारांकडून पाटील यांच्या निकटवर्तीयांना काही पैसे मिळाल्याचा आरोप आहे. यावेळी जयंत पाटील हे राज्य सरकारमध्ये मंत्री होते. पाटील यांना या प्रकरणात काही आर्थिक लाभ झाला का, याचा तपास करण्यासाठी ईडीने पाटील यांची चौकशी केल्याचे समजते.

वाट्टेल ती किंमत देऊसत्ताधाऱ्यांची राष्ट्रवादीकडून काही अपेक्षा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काय असेल ती किंमत देऊ, पण अपेक्षा पूर्ण करणार नाही, हे सूत्र त्यांना पसंत पडत नसल्याने या यातना सहन कराव्या लागत आहेत.     - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी

ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला जे प्रश्न विचारले, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी त्यांना दिली. त्यांचे समाधान करूनच मी त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडलो. आता त्यांचे काही प्रश्न शिल्लक असतील असे वाटत नाही. मी आयुष्यात काहीही चुकीचे केलेले नाही.    - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेस