शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

"...तेव्हा बडवे आडवे नाही आले!"; जयंत पाटलांनी पवारांसमोरच भुजबळांना सुनावलं, केला थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 17:26 IST

"...तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मला दोन लोकांची नावे विचारली होती. शरद पवार यांनी पहिले नाव छगन भुजबळ यांचे घेतले."

पवार साहेबांनी अनेकांना मोठ-मोठ्या संधी दिल्या. पण आता 'विठ्ठलाच्या सभोवताली बडवे आहेत, ते आम्हाला भेटू देत नाहीत', असे ते सांगत आहेत. बडवे जर आडवे येत होते, तर शिवाजी महाराजांच्या साक्षिने शिवतिर्थावर आपण लाखो लोकांच्या साथीने उद्धव ठाकरेंच्या मंत्रीमंडळात शपथ घेतली, तेव्हा बडवे आडवे नाही आले. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मला दोन लोकांची नावे विचारली होती. शरद पवार यांनी पहिले नाव छगन भुजबळ यांचे घेतले. तेव्हा बडवे आडवे नाही आले. अशा शब्दात जयंत पाटील यांनी छगण भुजबळांचा समाचार घेत निशाणा साधला. ते शरद पवार यांनी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीत बोलत होते. 

या महाराष्ट्राला तुम्ही काय उत्तर देणार...?छगण भुजबळांना फुले पगडीची आठवण करून देत जयंत पाटील म्हणाले, "पवार साहेब, दोन वर्षांचा तुरुंगवास भोगून पुण्याला त्यांचे आगमण झाले. तेव्हा त्यांच्या डोक्यावर फुले पगडी तुम्ही ठेवली होती, आठवतं का बघा. महात्मा फुल्यांच्या विचारांची ती पगडी त्यांच्या डोक्यावर ठेवली, तेव्हा बडवे आडवे आले नाही. त्या पगडी खालील तुमचा डोक्यातून ज्योतिराव फुलेंचा विचार निघून गेला, तुम्ही त्या डोक्यातला फुल्यांचा विचार काढून टाकला आणि ज्यांनी ज्योतीराव फुले आणि सावित्री बाईंची चेष्टा केली त्यांच्या मांडिला मांडी लाऊन बसायला लागलात, या महाराष्ट्राला तुम्ही काय उत्तर देणार हे सांगा?" 

राज्यात पक्षांची चोरी करणाऱ्या लोकांचा थयथयाट -पाटील म्हणाले, "आज राज्यात पक्षांची चोरी करणाऱ्या लोकांचा थयथयाट सुरू आहे. एका पक्षाची चोरी झाली. जो आडवा येतो, तो आम्हाला आवडत नाही. त्याचा पक्षच काढून घेण्याची तयारी आम्ही करतो. शिवसेनेच्या बाबतीत जे झाले, तेच आज राष्ट्रवादीच्या बाबतीत करण्याचा मानस काही लोकांचा आहे. पण राष्ट्रवादी येथे बसलेल्या सर्वांची आहे आणि तेथे गेलेल्या सर्वांनी राष्ट्रवादीसाठी काम केले आहे. आपल्या सर्वांची ही राष्ट्रवादी नामशेश करावी, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून राष्ट्रवादी संपली पाहिजे, अशी भूमिका ठेऊन कुणी काम करत असेल, तर आज सर्वांनी विचार करायला हवा. आजूनही वेळ गेलेली नाही."

शरद पवारांचा झंजावात -"शरद पवारांचा झंजावात महाराष्ट्रात फिरायला लागला, तर काय परिस्थिती होईल याची छोटीशी चुनूक आपण सातारा आणि कराडमध्ये पाहिली आहे. वय कितीही झाले असले तरी या नेत्याचा संपूर्ण भारतात दरारा आहे," असेही पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना शरद पवार यांच्या सोबत राहण्याची शपथही दिली. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस