javed akhtar slams waris pathan | वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वारिस पठाणांवर भडकले जावेद अख्तर; म्हणाले...

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वारिस पठाणांवर भडकले जावेद अख्तर; म्हणाले...

मुंबई - बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर आपल्या सडतोड विचारासाठी सर्वांनाच परिचीत आहेत. नुकतेच एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी हिंदू-मुस्लीम यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्य केले. त्यावरून जावेद अख्तर चांगलेच भडकले असून त्यांनी वारीस पठाण यांना सुनावले आहे. 

वारीस पठाण हे मुस्लीम लीगच्या मानसिकतेचे असल्याचे अख्तर यांनी म्हटले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही देशातील मुस्लीम लीगची मानसिकता गेलेली दिसत नाही. याचे उदाहरण म्हणजे वारिस पठाण असल्याची टीका जावेद अख्तर यांनी केली. 

जावेद अख्तर यांनी वरिस पठाण यांना सवाल केला की, तुम्ही कोणाचे नोकर आहात. तुम्हाला 15 कोटी मुस्लिमांचा ठेका कोणी दिला. वारिस पठाण सारख्या लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला अख्तर यांनी दिला. कोल्हापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

आपल्याला स्वातंत्र्य मिळवावं लागेल. जी गोष्ट मागून मिळत नसेल, ती हिसकावून घ्यावी लागेल. आता ती वेळ आलेली आहे. आम्ही माता, भगिनींना पुढे करतो, असं ते म्हणतात. आता तर फक्त सिंहिणी बाहेर पडल्या आहेत आणि तरीही तुम्हाला घाम फुटला आहे. आम्हीदेखील त्यांच्या सोबत बाहेर पडलो, तर काय होईल याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा,' असं वादग्रस्त विधान वारिस पठाण यांनी केलं आहे.
 

Web Title: javed akhtar slams waris pathan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.