शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

राज्यात जलयुक्त शिवार मिशन मोडवर राबविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 12:27 PM

मुंबई : जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यात जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या ...

मुंबई : जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यात जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्याला गती देण्याकरिता शासनातर्फे रविवारी व्यक्ती विकास केंद्र - आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसमवेत सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. हॉटेल ताज येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुरूदेव श्री श्री रवीशंकर  उपस्थित होते.  

जालना जिल्ह्यात वाटूरमध्ये  जलयुक्त शिवारमुळे झालेली किमया पाहिली, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, यावर्षी पाऊसही कमी झाला आहे. त्यामुळे धरणांमधील साठवणूक क्षमता वाढविण्यावर शासन काम करत आहे. यावेळी राज्यात नैसर्गिक शेती करण्यासंदर्भात व्यक्ती विकास केंद्रासमवेत कृषी विभागानेदेखील सामंजस्य करार केला. 

२४ जिल्ह्यांत कामे करारावर सचिव सुनील चव्हाण आणि व्यक्ती विकास केंद्र - आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था केंद्राचे अध्यक्ष प्रसन्न प्रभू यांनी स्वाक्षरी केली. याद्वारे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, ठाणे, पालघर अशा २४ जिल्ह्यात जलयुक्तची कामे होणार आहेत. 

जलयुक्त शिवारचे देशात यश : फडणवीस- यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या २२ हजार गावांमध्ये मोठे काम झाले. - केंद्राने २०२०मध्ये जो अहवाल दिला, त्यात महाराष्ट्रातला वॉटर टेबल इतर सर्व राज्यांच्या तुलनेने वर आला, असे नमूद केले आहे. यामध्ये अर्थातच सिंहाचा वाटा हा आर्ट ऑफ लिव्हिंगचा आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार