“३९ वर्षे संघटनेत, निष्ठावंतांची तुमच्याकडे काय किंमत?”; ठाकरेंना सवाल करत बडा नेता शिवसेनेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 10:52 IST2025-11-13T10:49:50+5:302025-11-13T10:52:46+5:30
Shiv Sena Shinde Group News: कार्यकर्त्यांशी संबंध नसणे हा उद्धव ठाकरे यांचा वीक पॉईंट आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

“३९ वर्षे संघटनेत, निष्ठावंतांची तुमच्याकडे काय किंमत?”; ठाकरेंना सवाल करत बडा नेता शिवसेनेत
Shiv Sena Shinde Group News: प्रियंका चतुर्वेदी कुठे साध्या नगरसेवक झाल्या नव्हत्या, काँग्रेसमधून आल्या आणि ६ महिन्यात राज्यसभेवर गेल्या, अशी काय जादू आहे या लोकांकडे? ३९ वर्ष एका संघटनेमध्ये राहून दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना त्यांना परिषदेवर आणि राज्यसभेवर पाठवत असाल तर निष्ठावंतांची तुमच्याकडे काय किंमत आहे? असा सवाल करत ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
जालना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी पक्षावर टीका केली आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. लोकांच्या प्रश्नावरती आम्ही काम करतो आणि वेगवेगळे गुन्हे दाखल करून घेतो, पण हे लोक आयते येतात आणि मोठे कसे होतात? कार्यकर्त्यांशी संबंध नसणे हा उद्धव ठाकरे यांचा वीक पॉईंट आहे, असा आरोप भास्कर आंबेडकर यांनी केला.
भास्कर आंबेकर मैदानात उतरले, तर विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही
जालना जिल्ह्यात झालेल्या शिवसेना मेळाव्यास उपस्थित राहून बहुसंख्येने जमलेल्या शिवसैनिकांना एकनाथ शिंदे यांनी संबोधित केले. यावेळी लोटलेला जनसागर पाहून जालना महापालिकेवर भगवा फडकणारच याची खात्री झाल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले. या मेळाव्यात भास्कर आंबेकर यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. अर्जुनराव खोतकर, भास्कर आंबेकर आणि कार्यकर्ते जर मैदानात उतरले, तर विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. शिवसैनिक पेटला की मागे फिरत नाही, बूथप्रमुख हाच आपला कणा आहे, त्यांच्यात ‘सगळ्यात मजबूत कोण?’ अशी स्पर्धा लागली पाहिजे, अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री म्हणून नाही, एक कार्यकर्ता म्हणून इथे आलो आहे. तुम्ही प्रत्येक जण एकनाथ शिंदे बनून लोकांमध्ये जा, मग भगवा फडकणारच आणि त्याला कोणी थांबवू शकणार नाही असे याप्रसंगी निक्षून सांगितले.
दरम्यान, जालना-नांदेड समृद्धी महामार्गावरील शेतकऱ्यांना पूर्ण न्याय मिळेल, महात्मा फुले मार्केट, सिडको, पाणीपुरवठा आणि नगरविकास यांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. झोपडपट्टीतील २.५ लाख नागरिकांना हक्कपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. जालना शहराचा विकास आगामी काळात अधिक वेगाने होईल असे यावेळी आश्वस्त केले.
📍 #जालना |
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 12, 2025
जालना जिल्ह्यात झालेल्या विराट #शिवसेना मेळाव्यास उपस्थित राहून बहुसंख्येने जमलेल्या शिवसैनिकांना आज संबोधित केले. यावेळी लोटलेला जनसागर पाहून जालना महापालिकेवर भगवा फडकणारच याची खात्री झाल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.
या मेळाव्यात भास्करराव आंबेकर यांनी… pic.twitter.com/KQnoThUqoR