शहरं
Join us  
Trending Stories
1
चमत्कार...! ISRO चं मिशन फेल झालं, पण १६ पैकी एक सॅटेलाईट जिवंत वाचला! अवकाशातून पाठवला सिग्नल
2
ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
3
लग्नानंतर २० दिवसांतच नात्याला काळिमा! दिराचाच नववधूवर वाईट डोळा, सासूनेही दिली साथ; पती तर म्हणाला..
4
झाले आता TVS iCube ही पेटली! ते पण आपल्या कोल्हापुरात; एकटी ओला उगाच बदनाम झाली...
5
WPL 2026: अरे देवा!! इतिहासात पहिल्यांदाच घडले; डेब्यू मॅचमध्येच आयुषी सोनी 'रिटायर्ड आऊट'
6
TATA च्या 'या' कंपनीत पुन्हा मोठा 'सायलेंट कट'; Q3 मध्ये ११ हजार जणांची कपात, दोन तिमाहीत ३० हजार जणांची गेली नोकरी
7
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
8
इस्त्रायलचा मोठा धमाका! संयुक्त राष्ट्रांच्या ७ संस्थांसोबतचे संबंध तोडले; पक्षपाताचा आरोप करत घेतला टोकाचा निर्णय
9
२०२६चे पहिले सूर्य गोचर: १ उपाय, १ महिना लाभ; सरकारी कामात यश-लाभ, पैसा येईल, पण उधारी टाळा!
10
आता झेडपीची रणधुमाळी; १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान, तर सातला निकाल
11
कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण
12
भटका कुत्रा चावला तर जबर भरपाई द्यावी लागेल; न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा
13
मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडा; मुंबईत विविध ठिकाणच्या प्रकल्पांमुळे हवेचा दर्जा घसरला
14
भारतावर पुन्हा एकदा २५% टॅरिफ? इराणशी व्यापार करणे पडणार महागात; ट्रम्प आणखी आक्रमक
15
काय सांगता ! पुणे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध, चालक गाडी चालवतात शांतपणे
16
शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग
17
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
18
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
19
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
20
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणाहून लग्नासाठी निघाले, पण वाटेतच घात; बुलढाण्यात पती-पत्नीचा मृतदेह कारमध्ये आढळला, दाम्पत्य रात्रभर होतं बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 17:47 IST

लग्न सोहळ्यासाठी निघालेलं जळगावचं दाम्पत्य बुलढाण्यात कारसह विहिरीत मृत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Jalgaon Couple Found Dead: तेलंगणाहून एका लग्न सोहळ्यासाठी आपल्या खासगी कारने जळगावकडे निघालेले दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता झाले होते. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गालगतच्या एका विहिरीत त्यांची कार आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. क्रेनच्या सहाय्याने ही कार विहिरीतून बाहेर काढली असता, त्यामध्ये पती-पत्नी दोघांचेही मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अपघाताची शक्यता असली तरी घातपाताचा संशयही व्यक्त होत आहे.

तेलंगणाहून जळगावकडे येताना झाले गायब

जळगाव जिल्ह्यातील पद्मसिंह दामू पाटील हे तेलंगणा राज्यातील सीतापुरम येथील एका खासगी सिमेंट कंपनीत कार्यरत होते. पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या पत्नी नम्रता हे त्यांच्या MH 13 BN 8583 या कारने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे एका लग्न सोहळ्यासाठी गुरुवारी निघाले होते. सकाळी निघाल्यानंतर त्यांचे त्यांच्या भाऊ रमेश यांच्याशी बोलणे झाले होते. रात्री १० वाजेपर्यंत ते घरी पोहोचणे अपेक्षित होते. मात्र त्यानंतरही ते घरी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे रमेश यांनी पद्मसिंह यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा मोबाईल बंद येत होता. त्यानंतर त्यांनी नम्रता यांना फोन केला मात्र त्यांचाही फोन बंद येत होता. अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला तेव्हा बेपत्ता दाम्पत्याचे शेवटचे लोकेशन बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मलकापूर दरम्यान महामार्गावर असणाऱ्या वडनेर गावालगत आढळले.

यानंतर पोलिसांचे पथक तात्काळ शोधासाठी रवाना झाले. पोलिसांनी युद्ध पातळीवर शोधमोहीम राबवत असतानाच, वडनेर भोलजी नजीक राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या एका विहिरीमध्ये पांढऱ्या रंगाची कार आढळून आली. ही कार बेपत्ता झालेल्या पाटील दाम्पत्याचीच असल्याची शक्यता वर्तवण्यात आली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने ही कार विहिरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. कार बाहेर काढल्यानंतर, आतमध्ये पद्मसिंह पाटील आणि नम्रता या दोघांचेही मृतदेह आढळल्याने सर्वांना मोठा धक्का बसला.

लग्न सोहळ्यासाठी निघालेले दाम्पत्य अचानक विहिरीत कारसह कसे पडले, याबाबत गूढ कायम आहे. हा केवळ अपघात आहे की यामागे कोणताही घातपात आहे, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, दाम्पत्याच्या मृत्यूमागचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Couple en route to wedding found dead in car in well.

Web Summary : A couple traveling from Telangana to a wedding in Jalgaon were found dead in their car in a well in Buldhana. They had been missing overnight. Police investigate accident or foul play.
टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघातbuldhanaबुलडाणा