जळगावमध्ये नगरसेवकाच्या डोक्यात घातली कु-हाड, रूग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 17:03 IST2017-12-10T17:02:59+5:302017-12-10T17:03:53+5:30
दोन गट समोरासमोर आल्याने झालेल्या हाणामारीत नगरसेवकासह दोन्ही गटाचे सहा जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावमध्ये नगरसेवकाच्या डोक्यात घातली कु-हाड, रूग्णालयात दाखल
जळगाव : वॉर्ड क्रमांक ३२ मधील गाव दरवाजाजवळ सुरु असलेले पुलाचे काम बंद करण्याच्या कारणावरुन शफिक मिया सईद मिया याने नगरसेवक इकबाल उद्दीन जियाउद्दीन पिरजादे (वय ६०, रा. मेहरुण, जळगाव) यांच्या डोक्यात कु-हाड टाकून जीवंत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजता मेहरुणमधील गाव दरवाजाजवळ घडली.
इकबाल उद्दीन जियाउद्दीन पिरजादे यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी दोन गट समोरासमोर आल्याने झालेल्या हाणामारीत नगरसेवकासह दोन्ही गटाचे सहा जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.