शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

भाजपाचं लोकसभेतलं संख्याबळ घटण्याची शक्यता; महाराष्ट्रातल्या एका सदस्याची खासदारकी जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 3:54 AM

लोकसभा निवडणुकीवेळी जयसिद्धेश्वर यांच्या जातप्रमाणपत्रावर उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी आक्षेप घेतला होता.

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या बेडा जंगम जातीचा दावा अमान्य करून या जातीचे प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने सोमवारी अवैध ठरविले. या जातीचे प्रमाणपत्र देणाऱ्या खासदार जयसिद्धेश्वर, अक्कलकोट तसेच फसली उताºयाची बनावट नोंद करून देणाऱ्या उमरगा तहसील कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध न्यायालयात तत्काळ लेखी फिर्याद दाखल करावी, असे निर्देश समितीने दिले आहेत.लोकसभा निवडणुकीवेळी जयसिद्धेश्वर यांच्या जात प्रमाणपत्रावर उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी आक्षेप घेतला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळल्यानंतर प्रमोद गायकवाड, विनायक कंदकुरे आणि मिलिंद मुळे यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार केली होती.जयसिद्धेश्वर यांनी मूळ नावात बदल करून जात बदलली. त्यांची जात लिंगायत असताना खोट्या माहितीच्या आधारे बेडा जंगम जातीचा बनावट व बोगस दाखला तयार केला, असे तक्रारीत म्हटले होते. पडताळणी समितीने तक्रारदार व खासदारांनी सादर केलेले पुरावे तपासण्यासाठी दहा सुनावण्या घेतल्या. दक्षता पथकाने २६ नोव्हेंबर २०१९ रोजी चौकशी अहवाल सादर केला. समितीने ३१ डिसेंबर रोजी दक्षता पथकाच्या अहवालासह बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र रद्द का ठरविण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावून लेखी खुलासा मागविला होता.जिल्हा जात पडताळणी समितीने दिलेल्या या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर यांचे वकील संतोष न्हावकर यांनी सांगितले.शेतीचे उतारे नवीन पुरावेमोडी लिपीतील उताऱ्याची पडताळणी समितीने केली. खासदार महास्वामी यांनी समितीकडे १९ पुरावे सादर केले. दाखल केलेले फसल उतारेही अशाच प्रकारे संशयास्पद असल्याचे समितीने नमूद केले.

टॅग्स :BJPभाजपाMember of parliamentखासदार