शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

जैन समाजाने संघटित होण्याची गरज - नयपद्मसागर महाराज, विजय दर्डा, अमरीश पटेल यांच्यासह मान्यवरांचा सन्मान  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 05:20 IST

मुंबई : शांतता आणि अहिंसेच्या माध्यमातून जैन समाजाने विश्वाला जीवन जगण्याची शिकवण दिली. सामाजिक बांधिलकी जपणारा जैन समाज भूकंप व इतर आपत्तींंच्या प्रसंगी मदतीसाठी सर्वांत पुढे असतो. संघटन शक्तीच्या जोरावरच समाजातील सज्जन लोक दुष्ट प्रवृत्तींचा सामना करू शकतात. त्यामुळे जैन समाजाने संघटित होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नयपद्मसागर महाराज यांनी केले.जुहू ...

मुंबई : शांतता आणि अहिंसेच्या माध्यमातून जैन समाजाने विश्वाला जीवन जगण्याची शिकवण दिली. सामाजिक बांधिलकी जपणारा जैन समाज भूकंप व इतर आपत्तींंच्या प्रसंगी मदतीसाठी सर्वांत पुढे असतो. संघटन शक्तीच्या जोरावरच समाजातील सज्जन लोक दुष्ट प्रवृत्तींचा सामना करू शकतात. त्यामुळे जैन समाजाने संघटित होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नयपद्मसागर महाराज यांनी केले.जुहू येथील ‘ट्युलिप स्टार हॉटेल’मध्ये ‘जैन इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन’ (जिओ) या संस्थेच्या सांताक्रूझ, विलेपार्ले, जुहू, अंधेरी, वर्सोवा आणि गोरेगाव येथील विविध शाखांचे उद्घाटन आणि शपथग्रहण कार्यक्रमात नयपद्मसागर महाराज बोलत होते. या वेळी ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, शिक्षण महर्षी व माजी शिक्षणमंत्री अमरीश पटेल, युनियन बँकेचे चेअरमन केवल हुंडा, आयएएस अधिकारी पराग जैन, प्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे, आमदार अमित साटम, आमदार भारती लव्हेकर, ट्युलिप स्टार हॉटेलचे मालक अजित केरकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या वेळी नयपद्मसागर महाराजांच्या हस्ते विजय दर्डा, अमरीश पटेल, अजित केरकर यांचा पगडी, सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. तसेच, पराग जैन, केवल हुंडा यांचाही सत्कार झाला.विश्वात ‘जिओ’चा विस्तार करा, जैन युवाशक्ती वाढवा, असे आवाहन करत नयपद्मसागर महाराज म्हणाले की, आपत्तीच्या प्रसंगात सर्वांत पुढे असणाºया जैन समाजाच्या शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, कम्युनिटी हॉल नाहीत. प्रशासकीय सेवेत, न्यायदानात, तसेच राजकीय क्षेत्रात जैन समाजातील लोकांची संख्या कमी आहे. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे. जैन समाजातील नवीन पिढीला शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे उघडायला हवीत. प्रशासकीय सेवांचे प्रशिक्षण वर्ग तसेच दर तीन वर्षांत किमान एक शाळा-महाविद्यालय उभारण्याचा संकल्प करा, असे आवाहन नयपद्मसागर महाराज यांनी उपस्थित जैन बांधवांना केले. जैन बांधव म्हणजे व्यापार हे समीकरण असले तरी आता जैन बांधवांनी राजकारणात पुढे आले पाहिजे. नगरसेवक, आमदारकीच्या निवडणुकीत जो पक्ष जैन बांधवांना संधी देईल त्यांच्या पाठीमागे उभे राहा. अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढविण्यास सज्ज राहा. भविष्यात राज्यात आपले २०० नगरसेवक आणि ६५ आमदार निवडून आले पाहिजेत, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी या वेळी मांडली.‘जिओ’ संघटनेचा कार्यभार सांभाळणारे मनिष शाह यांचा गौरव करून नयपद्मसागर म्हणाले की, ९२४३०३७६०३ या क्रमांकावर मिस कॉल दिला की ‘जिओ’च्या विविध योजना आणि उपक्रमांंची माहिती मिळेल. ‘जिओ’च्या सदस्यांना पंतप्रधानांच्या स्टार्ट अप योजनेतून एक कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज संघटना उपलब्ध करून देणार आहे. तसेच संस्थेतर्फे रोजगार प्रशिक्षण केंद्रही सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. किरीट भन्साली यांच्या कार्याचाही नयपद्मसागर महाराज यांनी गौरव केला.या वेळी विजय दर्डा म्हणाले की, १९९४ साली मी ‘सकल जैन समाज’ या मंचाची स्थापना केली होती. जैन समाजाला अल्पसंख्याकांचा दर्जा मिळावा यासाठी आग्रह धरला होता. त्यानंतर काँग्रेसच्या अधिवेशनात या मागणीचा आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो. तेव्हा राहुल गांधी यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना सांगून हा प्रश्न तत्काळ सोडविला, हे विसरून चालणार नाही. जैन समाजातील मुला-मुलींनी आयएएस, आयपीएस, आयएफएस, विधि सेवांमध्येही प्रवेश करावा, यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले, त्यालाही आता चांगले यश मिळत आहे.नयपद्मसागर महाराज यांच्यात जैन समाजाला एकत्र आणण्याची अद्भुत शक्ती असल्याचेही विजय दर्डा यांनी नमूद केले.याप्रसंगी अमरीश पटेल म्हणाले की, आपण शाळा-कॉलेजच्या कामांमध्ये लक्ष द्यायला हवे. मुख्यमंत्र्यांना आपण ही बाब पटवून द्या. सध्याच्या काळात गरीब विद्यार्थ्यांची प्रतारणा होत आहे. वसतिगृहांची सुविधा गरीब विद्यार्थ्यांना परवडणारी नाही. त्यामुळे आता जैन समाजाने वसतिगृहांच्या उभारणीवर जोर द्यायला हवा. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह नाही, ही वस्तुस्थिती असल्याचेही पटेल यांनी आग्रहपूर्वक सांगितले.नयपद्मसागर महाराज यांना माझे नाव माहीत आहे, हीच मोठी गोष्ट असल्याचे प्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे याने नमूद केले.मीरा-भार्इंदरमध्ये एकजुटीचा विजयमीरा-भार्इंदरच्या महापालिका निवडणुकीत झालेला विजय हा जैन समाजाच्या एकजुटीचा विजय असल्याचे उद्गार नयपद्मसागर महाराज यांनी या कार्यक्रमात काढले. मीरा-भार्इंदरच्या निवडणुकीनंतर सेनेनेजैन मुनींवर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर समाज संघटित असल्याने झालेला हा विजय म्हणजे एकजुटीचे उत्तम उदाहरण असल्याचे नमूद करत नयपद्मसागर महाराज यांनी नाव न घेता शिवसेनेला टोला हाणला.

टॅग्स :Mumbaiमुंबई