Jagdish lad : बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे कोरोनाने निधन; ३४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 02:13 PM2021-04-30T14:13:06+5:302021-04-30T15:32:55+5:30

Jagdish lad dies : काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. उपचार सुरू असतानाच  शारीरिक स्थिती गंभीर झाल्याचं त्यांचा मृत्यू झाला. 

Jagdish lad : Mister india 34 year old body builder jagdish lad dies due to covid-19 | Jagdish lad : बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे कोरोनाने निधन; ३४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jagdish lad : बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे कोरोनाने निधन; ३४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

googlenewsNext

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून भारतभरात थैमान घातलं आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत सध्याच्या लाटेत अनपेक्षितपणे  जास्तीत जास्त तरूणांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. अशातच एक दुर्वैवी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. बॉडीबिल्डिंगमधले सर्व सर्वोच्च किताब जिंकणारे बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे निधन झालं. जगदीश हे केवळ ३४ वर्षांचे असताना कोरोनानं त्यांचा बळी घेतला असून बडोद्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

जगदीश यांच्या निधनाने त्यांचे नातेवाईक आणि बॉडीबिल्डिंग विश्वातील सगळ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. जगदीश हे नवी मुंबईत वास्तव्यात होते. गेल्यावर्षीच त्यांनी बडोद्यात व्यायामशाळा उघडली होती. त्यामुळे जास्तीजास्त वेळ जगदीश बडोद्यात असायचे. काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. उपचार सुरू असतानाच शारीरिक स्थिती गंभीर झाल्याचं त्यांचा मृत्यू झाला. 

कमी वयात बॉडी बिल्डींगला केली होती सुरूवात

जगदीश लाड यांनी फार कमी वयात बॉडीबिल्डिंगला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी वेगवेगळे पुरस्कार मिळवत या क्षेत्रात आपले वेगळे स्थान प्राप्त केले. अनेक तरूणांसाठी जगदीश हे प्रेरणास्थान होते. त्यांनी  नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये जवळपास चार वेळा सुवर्णपदकं मिळवली होती.  इतकंच नाही तर मिस्टर इंडिया स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. तसंच मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही त्यांनी कांस्य पदक मिळवलं होतं.

जगदीश यांच्या निधनानंतर महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोशिएशन आणि मुंबई असोशिएशनने दुःख व्यक्त केलं आहे. एक नावाजलेला चेहरा गेल्याने बॉडीबिल्डिंग विश्वाचं मोठं नुकसान झालं आहे. जाता जाता आपण फिट आहोत, आपल्याला काहीही होणार नाही असं समजत असलेल्या लोकांनाही धोक्याची सुचना देऊन गेले आहेत. 

एक जंटलमन शरीरसौष्ठवपटू गमावला...

जगदीश हा केवळ मेहनती खेळाडू नव्हता. तो एक सुसंस्कृत आणि सभ्य खेळाडू होता. त्याची पूर्ण कारकीर्द आव्हानं झेलण्यातच गेली. तो ज्या गटात खेळायचा, त्या गटातच स्पर्धेचा विजेताही असायचा. त्यामुळे त्याची गाठ नेहमीच दिग्गजांशीच पडायची. जगदीशही दिग्गजच होता. तो अनेकदा उपविजेता ठरला. कधी विजेताही ठरला. पण त्याने पंचांच्या निर्णयाबाबत अन्य खेळाडूंप्रमाणे कधीच वाद घातला नाही. कधीही संताप व्यक्त केला नाही. तो खऱ्या अर्थानं जंटलमन खेळाडू होता. त्याच्या निधनामुळे आम्ही एक विजेताच नव्हे एक प्रामाणिक खेळाडू गमावल्याची भावना जागतिक शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी व्यक्त केली. 

जिंको किंवा हरो, चेहऱ्यावर नेहमीच स्मितहास्य मिरवणारा खेळाडू अवघ्या जगाने गमावलाय. खेळाप्रती असलेली त्याची प्रामाणिक भावना आणि मेहनती वृत्ती आम्ही कदापि विसरू शकत नाही. जगदीशचं जाणं, मेंदू आणि मन सुन्न करणारं आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर लाड कुटुंबीय आणि शरीरसौष्ठव जगताला देवो, अशी भावना महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आपटे आणि सरचिटणीस विक्रम रोठे यांनी व्यक्त केली. 

खेळात जिंकण्यासाठीच सारे खेळतात, जगदीशही जिंकण्यासाठीच खेळायचा. पण पराभवानंतरही तो सर्वांची मनं जिंकायचा. त्याने कधीही विजयाचा उन्माद आणि पराभवाचं दुख व्यक्त केलं नाही. खेळाडू कसा असावा, याचे जीवंत उदाहरण जगदीश होता. त्याचासारखी खिलाडूवृत्ती फारच कमी खेळाडूंमध्ये असते. त्याच्या जाण्याने शरीरसौष्ठव जगताची खूप मोठी हानी झाल्याची आदरांजली बृहन्मुंबई  शरीरसौष्ठव संघटनेचे  सरचिटणीस राजेश सावंत यांनी वाहिली.

Read in English

Web Title: Jagdish lad : Mister india 34 year old body builder jagdish lad dies due to covid-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.