शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

चिंताजनक! शेअरबाजार सावरायला तीन ते सहा महिने लागतील : अर्थ अभ्यासकांचे मत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 3:21 PM

गेले दोन दिवस शेअरबाजारात मोठी पडझड; गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण

ठळक मुद्देनिर्देशांकाचा फुगा फुटण्यास कोरोनाचे निमित्त सेन्सेक्स गडगडला सुमारे साडेतीन हजार आणि निफ्टी ९०० अंकांनी

पुणे : मंदीतून अर्थव्यवस्था जात असतानाच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने मंदीत तेल ओतले आहे. सेवा, ऑटोमोबाईल, रसायन या उद्योगांवर थेट परिणाम झाला आहे. आयात आणि निर्यातीलादेखील याचा फटका बसला असून, त्याचे प्रत्यक्ष परिणाम दिसायला दीड-दोन महिने लागतील. या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे शेअरबाजार गडगडला आहे. बाजार सावरायला तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असे शेअरबाजार अभ्यासकांचे म्हणणे आहे.गेले दोन दिवस शेअरबाजारात मोठी पडझड होत आहे. सेन्सेक्स सुमारे साडेतीन हजार आणि निफ्टी ९०० अंकांनी गडगडला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषत:, म्युच्युअल फंड आणि सिस्टिमॅटीक इनव्हेस्टमेंट प्लानमधे (एसआयपी) गुंतवणूक करणारे धास्तावले आहेत. या पार्श्वभूमीवर, बोलताना सीए दिलीप सातभाई म्हणाले, की बाजारातील पडझड ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यापूर्वी २००८ सालीदेखील बाजार कोसळला होता. बाजार निर्देशांकाचा वाढलेला फुगा केव्हातरी फुटणारच होता. त्याला कोरोनाचे निमित्त मिळाले. गेले काही महिने देशात मंदीचे वातावरण असूनही बाजाराचा निर्देशांक वाढतच होता. त्यामुळे प्रत्येक वेळी मंदीमुळेच बाजार कोसळतो, असे नाही. सट्टेबाज आणि काही प्रमाणात सरकारदेखील हस्तक्षेप करून बाजाराचा निर्देशांक कमी-अधिक होण्यास हातभार लावत असते. आत्ताची मंदी मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त प्रमाण, तसेच महागाई निर्देशांकात वाढ झाल्यामुळे जाणवत आहे. बाजार पूर्ववत होण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागेल.कोरोनामुळे पर्यटन, बिझनेस टूरला फटका बसला आहे. त्यामुळे सेवाक्षेत्राला त्याची थेट झळ पोहोचेल. रशिया-सौदी अरेबियामधील तेलयुद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाचे दर ६२ वरून ३५ डॉलर प्रतिबॅरल झाले आहेत. येस बँकेवरील निर्बंधांमुळे पुन्हा एकदा बँकिंग क्षेत्राला हादरा बसला आहे. रसायनांचा कच्चा माल चीनमधून येत असल्याने या उद्योगाला फटका बसला असून, फोर्जिंग उद्योगही प्रभावित झाला आहे. युरोप आणि अमेरिकेतील आयात-निर्यात प्रभावित झाली आहे. त्याचा दृश्य परिणाम दिसण्यास एक ते दीड महिना लागेल. याच्या एकत्रित परिणामामुळे शेअरबाजार प्रभावित झाला आहे. बाजार पूर्वपदावर येण्यास किमान तीन महिन्यांचा कालावधी लागेल, असे अर्थ अभ्यासक सुहास राजदेरकर यांनी सांगितले. बाजार कोसळला असला तरी सिप, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक थांबवू नये; उलट ती वाढवावी. त्याचा पुढे फायदा होईल, असेही राजदेरकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Puneपुणेshare marketशेअर बाजारcorona virusकोरोनाInvestmentगुंतवणूकEconomyअर्थव्यवस्थाGovernmentसरकार