शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कोणाला आंदोलनाची इच्छा होणे गैर नाही : सुप्रिया सुळे यांनी राजू शेट्टींना लगावला जोरदार टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 12:59 IST

कोणाला आंदोलनाची इच्छा झाली तर त्याचे स्वागत करायला हवे...

ठळक मुद्देखासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची घेतली भेट

पुणे : लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. आमचे सरकार दडपशाहीचे सरकार नाही. त्यामुळे कोणाला आंदोलनाची इच्छा झाली तर त्याचे स्वागत करायला हवे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राजू शेट्टी यांना टोला लगावला. दूध दरावरून शेतकरी संघटनेने बारामतीमध्ये सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुळे यांनी हे वक्तव्य केले.

सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची गुरुवारी भेट घेत कोरोनाची शहरातील स्थिती आणि त्यांच्या मतदार संघातील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी हडपसरमधून वेगळ्या महापालिकेची चर्चा होत असताना २३ गावे, सर्व संघटना, सर्व राजकीय पक्ष यांच्याशी सविस्तर चर्चा केली जावी. पालकमंत्र्यांसोबत चर्चा होणे आवश्यक असल्याचे सुळे म्हणाल्या. परभणीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयावर झालेली दगडफेक दुर्दैवी असून याविषयाची माहिती जाणून घेणार आहे. 

विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या परीक्षांबाबत सुळे म्हणाल्या, जेईई-नीट वगैरे परिक्षांबाबत आता तारखा पुढे ढकलू नयेत अशी न्यायालयाला विनंती करते. देशभरातील राज्य सरकारांनी आपापली भूमिका न्यायालयात मांडली आहे. त्यामुळे आता वेळेत निर्णय व्हावा. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने यावर फार बोलणे उचित होणार नसून महाराष्ट्र शासनाचे जे मत आहे तेच माझे मत असल्याचेही सुळे म्हणाल्या. धुळ्यामध्ये विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार चुकीचा असून त्याची चौकशी व्हायला हवी. खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारने मशिदी उघडू दिल्या नाहीत तर आम्ही स्वतः उघडू असा इशारा दिला आहे. त्यावर बोलताना सुळे म्हणाल्या, सरकारला वेळ देणे आवश्यक असून मागण्या, सूचना यांचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागतो. लोकशाहीने जलील यांना आंदोलनाचा अधिकार दिला आहे. यावेळी परभणीच्या शिवसेना खासदारांचा राजीनामा आणि सुशांतसिंग रजपूत सीबीआय चौकशी प्रकरणावर बोलणे त्यांनी टाळले. विशेषतः सुशांतसिंग रजपूत प्रकरणावर बोलायला आवडत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.-------राज्यातील जिम, थिएटर, मंदिरे सुरू करावीत, ई-पास रद्द करण्याची मागणी होत आहे. केंद्र शासनानेही निर्णय दिला असताना राज्य शासनाची भूमिका विरोधी का आहे या पत्रकारांच्या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, पुण्यात कोविडबाबत स्थिरता असली तरी परिस्थिती धोक्याबाहेर आहे असे म्हणता येणार नाही. कोणीही धोका पत्करू नये. याबाबत तज्ज्ञांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे. राज्यातील इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. येत्या आठ दहा दिवसांत राज्यातील चित्र आणखी सुधारण्याची शक्यता आहे. त्यानंतर, मुख्यमंत्री व पालकमंत्री याबाबत निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेRaju Shettyराजू शेट्टीagitationआंदोलनState Governmentराज्य सरकारAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारण