शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच राम मंदिराचा मुद्दा हाती : उध्दव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 15:51 IST

ताकाला जाऊन भांडे लपविण्याची आम्हांला सवय नाही..

ठळक मुद्देकिल्ले शिवनेरीवर मंगल कल़श पुजन शिवनेरीवरील पवित्र पाणी व मातीचा मंगल कलश सोबत घेवून उद्धव ठाकरे अयोध्येला कुच करणार

जुन्नर : अटलबिहारी वाजपेयी यांचे मिलीजुली सरकार होते. आता केंद्रात पूर्ण बहुमताचे सरकार आहे. मग राममंदिर उभारणीस विलंब का.? निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच राममंदिराचा मुद्दा हातात घेतला आहे. ताकाला जाऊन भांडे लपविण्याची आम्हांला सवय नाही. मला काही जणांची भांडेफोड करायची आहे, अशी अप्रत्यक्षरित्या भाजपा सरकारवर टिपणी करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवनेरी किल्ल्यावर केली. शिवसेनेच्या वतीने अयोध्यकडे प्रस्थान करण्यापूर्वी त्यांनी शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ठाकरे यांनी राममंदिराविषयीची भूमिका स्पष्ट केली. 

शिवसेनेच्या वतीने अयोध्या येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी चैतन्यस्थळ स्फूर्ती शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवरून मंगल कल़श नेण्यात आला. शिवसेना पक्षनेते उद्धव ठाकरे दि.२५ रोजी अयोध्या येथे रामजन्मभूमीत दर्शनासाठी जात आहेत. तत्पूर्वी त्यांनी पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर,खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,आमदार शरद सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ले शिवनेरीवरील पवित्र माती व जल यांच्या मंगल कलशाचे पुजन करण्यात आले. शिवनेरी वरील पवित्र पाणी व मातीचा मंगल कलश सोबत घेवून उद्धव ठाकरे अयोध्येला कुच करणार आहे. या कार्यक्रमात शिवसेना जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके,पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण ,नगराध्यक्ष शाम पांडे, शिवसेना जिल्हाप्रमुख राम गावडे, उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी,तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, नारायणगावचे सरपंच बाबू पाटे, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, अरुण गिरे,युवासेना जिल्हाध्यक्ष गणेश कवडे,नगरसेवक दीपेश परदेशी, यांसह शिवसेनेचे विविध पदाधिकारी,शिवसैनिक मोठ्या संख्येने गडावर उपस्थित होते.   उध्दव ठाकरे म्हणाले, राम मंदिर आणि हिंदुत्व याविषयावर कोणतेही गट तट असू नयेत. आमचं हृदय,मन भगवे आहे. किल्ले शिवनेरीची माती पवित्र माती आहे. या मातीमध्ये चमत्कार करणारी ताकद आहे. किल्ले शिवनेरी हिंदुस्थानातील पवित्रस्थान आहे. शिवनेरीवरील माती हिंदू धर्मियांच्या भावना म्हणुन अयोध्येस नेत आहे. .महाराष्ट नवनिर्माण सेनेचे राज्यातील एकमेव आमदार शरद सोनवणे यांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती चर्चेची ठरली. किल्ले शिवनेरीवर रुद्राक्षाची पाच झाडे शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांच्या हस्ते लावण्यात आली

टॅग्स :PuneपुणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAyodhyaअयोध्याShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजPoliticsराजकारण