शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

LPG Gas Shortage: राज्यात गॅसचा मर्यादित साठा, हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठं संकट, कुठे- काय परिस्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 19:41 IST

Israel-Iran War Impact on India: अमेरिका इस्रायल- इराण युद्धाचे परिणाम आता महाराष्ट्रातही दिसू लागले आहेत. ऊर्जेचा मोठा स्रोत असलेल्या मध्य पूर्वेतून होणारा एलपीजी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे महाराष्ट्रात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.

अमेरिका इस्रायल- इराण युद्धाचे परिणाम आता महाराष्ट्रातही दिसू लागले आहेत. ऊर्जेचा मोठा स्रोत असलेल्या मध्य पूर्वेतून होणारा एलपीजी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे महाराष्ट्रात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, राज्यातील हॉटेल व्यावसायिकांकडे अवघा एक दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक असून, अनेक शहरांत हॉटेल चालकांवर चक्क चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये गॅस पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा साठा संपत आल्याने हॉटेल चालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक हॉटेल चालकांवर चक्क चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस उपलब्ध नसल्याने अनेक हॉटेल चालकांनी हॉटेलच्या बाहेरच चुलभट्ट्या पेटवल्या आहेत. शहरातील खानावळी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी गॅसची वाट पाहण्याऐवजी लाकूड आणि कोळशावर आधारित चुलींचा वापर सुरू केला आहे. "हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात जेवण शिजवावे लागते, इतक्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करणे परवडणारे नाही," अशी व्यथा हॉटेल व्यावसायिकांनी मांडली आहे. उपराजधानी नागपुरातही व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्याचे चित्र आहे. गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अनेक नामांकित हॉटेलच्या मालकांनी आता चुलींचा आधार घेतला आहे. मात्र, यामुळे जेवण मिळण्यास उशीर होत असून ग्राहकांचीही गैरसोय होत आहे.

सोलापूरात पहाटेपासूनच गॅस वितरण केंद्राबाहेर रांगा

सोलापूरच्या रामवाडी परिसरातील गॅस गोडाऊनवर आज अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. "चार दिवसांपूर्वी बुकिंग करूनही आज नंबर लागला," अशी हतबलता ग्राहकांनी व्यक्त केली. ऑनलाइन बुकिंग होत नसल्याने अनेक नागरिक थेट रिकाम्या टाक्या घेऊन ऑफिसवर धडकले. "टाक्या उपलब्ध आहेत, गर्दी करू नका," असे आवाहन एजन्सीकडून केले जात असले, तरी 'पुढच्या काळात गॅस मिळेल की नाही' या भीतीने ग्राहक हटायला तयार नाहीत.

जळगावात महिनाभरापासून बुकिंग पेंडिंग

जळगावच्या बी.जे. मार्केटमधील भारत गॅस एजन्सीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. "महिनाभरापूर्वी बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नाही, मग घरात स्वयंपाक कसा करायचा?" असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला. एजन्सीचे कर्मचारी दाद देत नसल्याचा गंभीर आरोपही ग्राहकांनी केला आहे. युद्धाच्या नावाखाली साठेबाजी तर होत नाही ना? असा संशय आता जळगावकर व्यक्त करत आहेत.

अमरावतीत सामान्य ग्राहकांचे हाल

अमरावतीच्या रुक्मिणी नगरमध्ये गॅस एजन्सीने केवळ व्हॉट्सॲपवर बुकिंग अनिवार्य केल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. अनेकांकडे कंपनीचे अधिकृत व्हॉट्सॲप नंबर नाहीत, तर काहींना तंत्रज्ञानाची माहिती नाही. अशा परिस्थितीत ज्यांचे व्हॉट्सॲप बुकिंग आहे, त्यांनाच प्राधान्य दिले जात असल्याने सामान्य ग्राहक तासनतास रांगेत उभे आहेत.

जालन्यातील हॉटेल व्यावसायिक संकटात

जालन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. हॉटेल चालक आणि छोट्या खानावळींकडे केवळ १ ते २ दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. "गॅस संपला तर चूल पेटवण्याशिवाय पर्याय नाही, पण रोजच्या धंद्याचं काय?" असा प्रश्न जालन्यातील व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : LPG Shortage Hits Maharashtra: Hotels Face Crisis, Cooking on Stoves

Web Summary : Maharashtra faces LPG shortage due to disrupted Middle East supply. Hotels struggle, turning to wood stoves. Cities like Mumbai and Nagpur are severely affected, impacting businesses and consumers. Solapur, Jalgaon, Amravati and Jalna report citizen distress.
टॅग्स :Warयुद्धMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईnagpurनागपूरchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर