शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामिक राष्ट्रे आपापसात युद्ध करतील, देशाच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल; बाळूमामा भंडारा यात्रेत कृष्णात डोणे महाराजांनी केली भाकणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 14:19 IST

महाराष्ट्राच्या राजकारणात छोटे पक्ष मोठे होणार, केंद्रात..

बाजीराव जठार    वाघापूर : इस्लामिक राष्ट्रे आपापसात युद्ध करतील, राजकारणात मोठा गोंधळ होईल, साखर कारखान्याचा मॅनेंजर आनंदात राहील, कोरोनापेक्षा मोठा आजार येईल, शंभर वर्षांनंतर माणूस पृथ्वी सोडेल, कर्नाटक राज्याच्या जलाशयाला मोठे भगदाड पडेल, देशात समान नागरी कायदा होणार अशी भाकणूक कृष्णात बाबूराव डोणे-पुजारी (वाघापूरकर) यांनी श्रीक्षेत्र आदमापूर ता. भुदरगड येथील बाळूमामा भंडारा यात्राप्रसंगी केली.बाळूमामा देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभो भाविकांसमोर काल, रविवारी पहाटे चार वाजता सुरू झालेली ही भाकणूक साडे सहा वाजता संपली. तब्बल अडीच तास सुरु असलेली ही भाकणूक ऐकायला भाविकांनी मोठी गर्दी केली होती.अशी केली भाकणूक..राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल, आदमापूर हे गाव प्रतिपंढरपूर होईल, होईल होईल जलप्रलय होईल, जलाशयाला मोठं भगदाड पडंल,  जातीवाद, राजकारण, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न चर्चेत येईल, रेल्वे, विमाने मोठ्या वाहनांचे अपघात होतील, कर्नाटक राज्याचे राजकारण डळमळीत होणार, महाराष्ट्राच्या राजकारणात छोटे पक्ष मोठे होणार, केंद्रात मात्र कमळ फुलणार, बहीण भावाच्या नात्याला कलंक लागेल, जगात सत्त्य फासावर जाणार, १२ वर्षांची मुलगी भ्रतार मागेल, तरुण पिढी वाईट मार्गाला लागंल, ३५ वर्षांचं म्हातारपण येईल.

वाचा: निढोरीतून आदमापूरकडे दुधाच्या घागरींची जल्लोषी मिरवणूक, भंडाऱ्याच्या उधळणीत भक्तिमय वातावरणमहागाईचा भस्मासूर येईल, जगणं मुश्कील होईलयेणार येणार राज्य गुंडांचं येणार, समान नागरी कायदा देशात होणार, उन्हाळ्याचा पावसाळा होईल, पावसाळ्याचा उन्हाळा होईल, वागा वागा सत्त्या न वागा, जंगलातला पक्षी, प्राणी गावात येईल, आदमापूर प्रति पंढरपूर होईल, माझी करशीला सेवा तर खाशीला मेवा, शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील, त्यांचा जयजयकार होईल, महागाईचा भस्मासूर येईल, सामान्य माणसाला जगणं मुश्कील होईल.

उन्हाळ्याचा पावसाळा अन् पावसाळ्याचा उन्हाळा होईल

पैशाच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळेल, उन्हाळ्याचा पावसाळा होईल अन् पावसाळ्याचा उन्हाळा होईल. नीतिमत्तेनं राहशीला तर सुखात राहशीला, ज्याच्याकडे धान्य तो शहाणा होईल. वैरणीला सोन्याची किंमत येईल, धान्यांची व वैरणीची चोरी होईल. बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. बैलाची किंमत बकऱ्याला येईल. आदमापूरवर माझा आशीर्वाद राहील. भाकणुकीला हजारो भाविक उपस्थित होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Balumama Bhandara Prophecy: Islamic Wars, Political Chaos Predicted by Krushnat Done

Web Summary : Krushnat Done predicted Islamic nations at war, political turmoil, and a worse pandemic. He foresaw natural disasters, a uniform civil code, and societal shifts, highlighting rising inflation and challenges for the common person. Admapur will become like Pandharpur, he added.