आर्चीसाठी इस्लामपुरातील तरुणाई झाली ‘सैराट’
By Admin | Updated: August 1, 2016 22:03 IST2016-08-01T21:38:24+5:302016-08-01T22:03:39+5:30
‘सैराट’फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू येणार म्हटल्यावर येथील अंबाबाई उद्यान परिसरात दुपारी एकपासून हजारो तरुण-तरुणी सैराट झाल्या होत्या. तब्बल दोन तास उशिरा येऊनही

आर्चीसाठी इस्लामपुरातील तरुणाई झाली ‘सैराट’
ऑनलाइन लोकमत
इस्लामपूर, दि. १ - ‘सैराट’फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू येणार म्हटल्यावर येथील अंबाबाई उद्यान परिसरात दुपारी एकपासून हजारो तरुण-तरुणी सैराट झाल्या होत्या. तब्बल दोन तास उशिरा येऊनही आणि भरपावसातही इस्लामपूर पालिकेने तयार केलेल्या अंबाबाई उद्यानाचा उद्घाटन सोहळा रिंकूच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी सैराट झालेल्या तरुणाईला रिंकूसारखे बना, पण अभ्यास करा, असा सल्ला दिला.
माजी मंत्री, आमदार जयंत पाटील म्हणाले, ‘सैराट’फेम रिंकू येणार म्हटल्यावर इस्लामपूर शहरच सैराट झाले आहे. नागरिकांनी या उद्यानाचा लाभ घ्यावा. शहरामध्ये विविध विकासकामे करण्याचा आमचा संकल्प आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरुने उद्यानाचे कौतुक करुन अभिनयााबरोबर स्वत:चे शिक्षणही पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट केले.
पावसामुळे उत्साहावर विरजण
इस्लामपुरातील अंबिका उद्यान उद्घाटनासाठी आर्ची येणार म्हटल्यावर तरुणाईची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. परंतु ऐन कार्यक्रमापूर्वी पावसाने जोरदार सुरुवात केली. त्यामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम १0 ते १५ मिनिटातच आटोपता घेण्यात आला. त्यामुळे तरुणांच्या उत्साहावर विरजण पडले. यावेळी गर्दीमुळे नागरिकांना बसण्यासाठी ठेवण्यात आलेल्या खुर्च्यांची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली.