शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

महायुतीसाठी 'हे' अशोभनीय, सुनील तटकरेंनी व्यक्त केलं स्पष्ट मत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:22 IST

मंडणगड : राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह प्रमुख मंत्री दावोस येथे परकीय गुंतवणूक आणण्यासाठी गेलेले असताना पालकमंत्री पदाबाबत प्रश्न निर्माण करून मिळालेल्या ...

मंडणगड : राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह प्रमुख मंत्री दावोस येथे परकीय गुंतवणूक आणण्यासाठी गेलेले असताना पालकमंत्री पदाबाबत प्रश्न निर्माण करून मिळालेल्या यशाला गालबोट लावण्याचे कृत्य अनाकलनीय आहे. हे महायुतीच्या शासनाला शोभनीय नसल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मंडणगड येथे व्यक्त केले.मंडणगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरुवारी नागरी सत्कार सोहळ्यानंतर भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. ते पुढे म्हणाले की, परस्पर समन्वय राखून पालकमंत्रिपदासह सर्व विषयांवरील समस्यांचे समाधान शोधले जाईल, असे ते म्हणाले. आंबडवे गावाचे आदर्श संसद ग्राम योजनेसंदर्भात विशेष बैठक आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच मंडणगड तालुक्यातील पर्यटन, जलमार्ग, दळणवळण यांबाबत विशेष मंडणगड पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येणार असून, त्याबाबतच्या नागरिकांच्या सूचना व प्रस्ताव त्यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन यावेळी केले. बाणकोट बागमांडला या ठिकाणी जुना पूल पाडून त्याच बाजूला ठिकाणी नव्याने साकारत असलेल्या सागरी सेतूचे बांधकाम फेब्रुवारी महिन्यात सुरू होण्याचे स्पष्ट संकेत दिले.यावेळी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, संदीप राजपुरे, तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, भाई पोस्टुरे, अजय बिरवटकर, स. तु. कदम, रमेश दळवी, लुकमान चिखलकर, साधना बोथरे, प्रतीक आंबरे, नेहा जाधव, वैभव कोकाटे, सोनल बेर्डे, रेश्मा मर्चंडे उपस्थित होते.जिल्हा निर्मितीबाबत कुठलाही प्रस्ताव नाहीसमाजमाध्यमावर मंडणगड जिल्ह्यांच्या निर्मितीसंदर्भात सुरू असलेल्या चर्चेच्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारले. त्यावर ते म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे असा कुठलाही प्रस्ताव शासन स्तरावर प्रस्तावित झालेला नाही. या संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही. नव्याने जिल्हा निर्मितीसाठी आवश्यक असणारे निकष व या शासनाचा अग्रक्रम यानुसार पुढील निर्णय घेतले जातील, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsunil tatkareसुनील तटकरेMahayutiमहायुतीguardian ministerपालक मंत्री