शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळा : आणखी २०० प्रकरणांची चौकशी; राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारचा इशारा

By अतुल कुलकर्णी | Updated: November 29, 2018 11:14 IST

सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या शपथपत्राने माजी जलसंपदामंत्री अजित पवार गोत्यात आले आहेत.

ठळक मुद्देआणखी २०० प्रकरणांची चौकशी राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारचा इशारा माजी जलसंपदामंत्री अजित पवार गोत्यात

मुंबई : सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या शपथपत्राने माजी जलसंपदामंत्री अजित पवार गोत्यात आले आहेत. हे शपथपत्र म्हणजे, भाजपाचे षडयंत्र असल्याची टीका विरोधकांनी करताच, आता दोन प्रकरणांच्या चौकशीचा अहवाल न्यायालयात आहे. आणखी २०० प्रकरणांची चौकशी बाकी असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

एसीबीने शपथपत्रात अजित पवार यांच्यावर अनियमिततेचा ठपका ठेवून सिंचन घोटाळ्यास त्यांना जबाबदार धरले आहे. विधिमंडळात मराठा आरक्षणाचा विषय तापलेला असताना, शपथपत्र सादर करण्यासाठी एसीबीने ‘हीच’ वेळ साधल्याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू आहे. विधिमंडळात याचे पडसाद उमटले नाहीत. मात्र, सभागृहाबाहेर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या कारवाईवर शंका व्यक्त केली.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, निवडणुका तोंडावर येताच, विरोधी पक्षाच्या नेत्याविषयी संशय निर्माण करण्याचे काम सरकार करत आहे. अजित पवार यांचा यात सहभाग नाही. ते न्यायालयीन लढाई लढतीलच, पण एसीबीचे शपथपत्र लगेच माध्यमांकडे कसे पोहोचले?

गिरीश महाजन म्हणाले, या चौकशीत सरकारचा हस्तक्षेप नाही. प्रकल्पांना मंजुरी देताना प्रक्रिया नियमानुसार पार पाडली नाही. त्यामुळे आक्षेप घेणे चुकीचे आहे. या प्रकरणाची ईडी चौकशी करणार का? असे विचारता, हा विषय सरकारपुढे नाही, असे ते म्हणाले.

भुजबळांची टीकासत्ता आल्यावर सत्ताधारी भुजबळ-भुजबळ करीत होते. आता निवडणुका येताच अजित पवारांना लक्ष्य केले आहे. आतापर्यंत सत्ताधारी झोपले होते का? मंत्री व भाजपाचे नेते आधी बोलतात, त्यानंतर पोलीस कारवाई होते, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला.

न्यायाधीशांचा नकार !या घोटाळ्याप्रकरणी बुधवारी नागपूर खंडपीठात सुनावणी होती, परंतु न्या. रवी देशपांडे यांनी वैयक्तिक कारणामुळे हे प्रकरण ऐकण्यास नकार दिला. त्यामुळे अर्जदारांना आता हे प्रकरण दुसऱ्या न्यायपीठापुढे लावून घ्यावे लागेल.चौकशीला सहकार्य - अजित पवारभाजपा नेत्यांनी माझ्यावर वेगवेगळे आरोप केले. त्यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी खुली चौकशी सुरू केली. मला चौकशीला बोलावले, तेव्हा मी गेलो. लेखी प्रश्नावलीला उत्तरे दिली. मी तपास यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करत आहे. कोणालाही फायदा होईल, असे काम मी केलेले नाही. प्रकरण न्यायालयात असल्याचे अधिक बोलू इच्छित नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पMaharashtraमहाराष्ट्र