शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

‘सिंचन’ चौकशीच्या फे-यात

By admin | Updated: January 30, 2015 04:32 IST

राज्यातील १२ सिंचन प्रकल्पांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून खुली चौकशी केली जाणार असल्याचे प्रतिज्ञापत्र अखेर राज्य शासनाने गुरुवारी उच्च न्यायालयात सादर केले़

मुंबई : राज्यातील १२ सिंचन प्रकल्पांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून खुली चौकशी केली जाणार असल्याचे प्रतिज्ञापत्र अखेर राज्य शासनाने गुरुवारी उच्च न्यायालयात सादर केले़ या चौकशीमुळे आघाडी सरकारमधील अनेक दिग्गज मंत्री अडचणीत येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी हे प्रतिज्ञापत्र न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठासमोर सादर केले़ जलसंपदा खात्याचे उपसचिव व अधीक्षक अभियंता डॉ़ संजय बेलसरे यांनी हे प्रतिज्ञापत्र केले आहे़ राज्य शासनाने १२ प्रकल्पांची एसीबीकडून खुली चौकशी करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे़ त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही सुनावणी ११ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली़ या प्रकरणी मयांक गांधी व इतरांनी जनहित याचिका केली आहे़ माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाची आखणी करताना पर्यावरण व इतर विभागांची परवानगी घेतलेली नाही़ हे प्रकल्प मंजूर करताना घोटाळा झाला असून, याचे कंत्राट देतानाही गैरप्रकार झाला आहे़ हा गैरप्रकार उघडकीस आणण्यासाठी या प्रकल्पांची निवृत्त न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे़ याचिकेवर प्रत्युत्तर सादर करताना वरील प्रतिज्ञापत्र न्यायालयाला दिले आहे. सिंचनातील गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी डॉ़ माधव चितळे समिती नेमण्यात आली होती. या समितीसमोर याचिकाकर्त्यांनीही म्हणणे सादर केले आहे़ त्यानुसार समितीने काही शिफारशीही केल्या आहेत़