शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

मंत्रालयातील खिडक्यांवर लागणार आता लोखंडी ग्रील! ‘शोले स्टाईल’आंदोलनाची परिणती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 8:34 PM

राज्यातील प्रशासनाचे मुख्य केंद्र असलेल्या मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावरील खिडक्यावरील मोकळ्या जागेत आता लवकरच भक्कम लोखंडी ग्रील बसविले जाणार आहेत.

 - जमीर काझी मुंबई : राज्यातील प्रशासनाचे मुख्य केंद्र असलेल्या मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावरील खिडक्यावरील मोकळ्या जागेत आता लवकरच भक्कम लोखंडी ग्रील बसविले जाणार आहेत. मंत्रालयात राज्यभरातून येणाºया नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव संरक्षण विभागाने हा निर्णय घेतला असून त्याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्लूडी) पाठविला आहे.उस्मानाबाद येथील एका तरुण शेतकºयांने दहा दिवसापूर्वी सातव्या मजल्याच्या सज्जावर चढून ‘शोले स्टाईल’आंदोलन करीत मंंत्री व अधिकाºयांना घाम फोडला होता. त्या पाश्वभूमीवर खिडक्याच्या वरील जागेत ग्रील बसविणे व चौकटी असलेल्या ठिकाणी दरवाजे तातडीने बसविण्याची सूचना करण्यात आली असल्याचे वरिष्ट अधिकाºयांकडून सांगण्यात आले.२६/११’च्या घटना आणि साडेचार वर्षापूर्वी मंत्रालयात लागलेल्या भीषण आगीच्या पाश्वभूमीवर मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आला आहे. मंत्रालयात येणाºया अभ्यगताची तपासणी करण्यासाठी तीनही प्रवेशद्वारावर आधुनिक सामुग्री कार्यरत आहे. तरीही विविध कामानिमित्य मुख्यमंत्री किंवा अन्य मंत्री, अधिकाºयांना भेटण्यासाठी आलेल्या काहीजणांनी मंत्रालयात आपली कामे न झाल्याच्या कारणास्तव आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या घटना गेल्या काही महिन्यात घडल्या आहेत. त्यामुळे सत्ताधाºयावर टीका करण्यासाठी विरोधी पक्षाना आयता मुद्दा मिळत असल्याने याबाबी टाळण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाºयांना वेळोवेळी केली आहे.तुळजापूर (जि.उस्मानाबाद) येथील ज्ञानेश्वर साळवे या तरुण शेतकºयाने कर्जमाफी होत नसल्याने १० नोव्हेंबरला मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील सज्जावर चढून आत्महत्या करण्याचा इशारा देत खळबळ उडवून दिली होती. कृषीमंत्र्यांची भेट होवू न दिल्यास उडी मारण्याची धमकी देत सुमारे दीड तास पोलीस व प्रशासनााची भंबेरी उडविली. त्यावेळी निरीक्षक संतोष ढेमरे यांनी मोठ्या शिताफीने प्रंसगावधान राखीत साळवेने खाली फेकलेल्या चिठ्ठीवरील नंबरवरुन त्याच्याशी संपर्क साधला. सुमारे २० मिनिटे मोबाईलवरुन संभाषण करीत त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. दरम्यानच्या काळात राज्यमंत्री रणजित पाटील, दीपक केसरकर शिक्षणमंत्री विनोद तावडे,व अन्य अधिकारी त्याठिकाणी पोहचत समजूत काढीत त्याला सुखरुपपणे खाली उतरविले. या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याने वरिष्ठ अधिकाºयांनी पुन्हा एकदा आढावा घेतला. मंत्रालयातील खिडक्याच्या वरील जागेत लोखंडी ग्रील व नुसत्या चौकटी असलेल्या ठिकाणी तातडीने दरवाजे बसविण्याची सूचना ‘पीडब्ल्यूडी’ला विभागाला केली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिका-याच्या नेतृत्वाखालील सहाय्यक आयुक्त, ९ निरीक्षक,२० उपनिरीक्षकासह सुमारे २०० अंमलदाराचा फौजफाटा कार्यरत आहे. त्यामध्ये ४०वर महिला पोलिसांचा समावेश आहे. मेटल डिटेक्टर,स्कॅनिग मशीनच्या सहाय्याने त्यांच्याकडून अभ्यागताची तपासणी केली जाते. रोज १० हजारावर अभ्यागतमंत्रालयातील विविध विभागातील अधिकारी,कर्मचाºयांची संख्या सहा हजारावर असून त्याशिवाय रोज ३ ते ४ हजार अभ्यागत विविध कामासाठी येत असतात. त्याशिवाय मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या दिवशी हे प्रमाण ७,८ हजारापर्यत जाते. त्यामध्ये राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय असते. त्यामुळे सरासरी १० ते १४ हजार अभ्यागत मंत्रालयात हजेरी लावित असून त्यांच्यावर देखरेख ठेवताना पोलिसांची तारांबळ उडते.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार