शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींच्या कारखान्यांची ईडीकडून चौकशी करा, अमित शहांना पत्राद्वारे भाजपची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 06:12 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ३ जुलैला अमित शहा यांना पाठविलेल्या पत्रासोबत ३० साखर कारखान्यांची यादी जोडली आहे.

यदु जोशी - मुंबई : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी बंद पडलेले विदर्भातील दोन सहकारी साखर कारखाने विकत घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम काही वर्षांपूर्वी केले. मात्र, प्रदेश भाजपच्या वतीने राज्यातील साखर कारखान्यांच्या विक्रीची सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केलेल्या मागणीत या दोन्ही कारखान्यांचाही समावेश आहे. (Investigate Gadkari's factories from ED, BJP's demand in a letter to Amit Shah)भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ३ जुलैला अमित शहा यांना पाठविलेल्या पत्रासोबत ३० साखर कारखान्यांची यादी जोडली आहे. त्यात वर्धा जिल्ह्यातील महात्मा सहकारी साखर कारखाना आणि भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. विदर्भातील साखर कारखानदारी जिवंत राहावी यासाठी गडकरींच्या नेतृत्वातील पूर्ती कंपनीने  अनुक्रमे २००९ आणि २०१० मध्ये हे कारखाने लिलावात विकत घेतले होते. दोन्ही कारखाने बंद अवस्थेत होते. जवळपास पाच-सहा वर्षे ते बंद असताना कोणी विकत घ्यायला समोर येत नव्हते. वैनगंगा कारखान्यासाठी तर राज्य सहकारी बँकेने तीनवेळा लिलाव केला, पण कोणी पुढे आले नव्हते. 

महात्मा साखर कारखाना १५-१६ वर्षे चांगल्यारीतीने सहकार तत्त्वावर सुरू होता, पण पुढे तो बंद पडला. तेव्हा हा कारखाना गडकरी यांनी विकत घ्यावा, असे साकडे हजारो शेतकऱ्यांनी त्यांना घातले होते. वर्धेचे तत्कालीन खासदार दत्ता मेघे यांनी शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करून गडकरींना कारखाना घ्यायला लावला होता. त्यावेळी या कारखान्याची ऑफसेट व्हॅल्यू दहा कोटी रुपये होती. गडकरींनी कारखाना १४ कोटी रुपयांना खरेदी केला होता. वैनगंगा सहकारी साखर कारखान्याची ऑफसेट व्हॅल्यू १० कोटी रुपये होती व तो १४ कोटी रुपयांना खरेदी केला होता. आज हे दोन्ही कारखाने गडकरी यांच्या मार्गदर्शनाखालील मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रिज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडमार्फत चालविले जातात. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी विनंती केल्यानंतर गडकरींनी त्यावेळी हा कारखाना विकत घेतला होता. 

पत्रामुळे आश्चर्य- जे साखर कारखाने आज ईडीच्या रडारवर आहेत त्यांच्यावर मुख्यत्वे ते खासगी कंपन्यांनी विकत घेतल्यानंतरही राज्य सहकारी बँकेने त्यांना कोट्यवधी रुपयांची कर्जे दिली, असा प्रमुख आरोप आहे. मात्र, गडकरी यांनी महात्मा व वैनगंगा कारखाना विकत घेतल्यानंतर राज्य बँकेकडून कर्ज घेतलेच नाही. - या दोन कारखान्यांसाठी अनुक्रमे आंध्र बँक आणि बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेण्यात आले होते. असे असतानाही या दोन्ही कारखान्यांना ईडी चौकशीच्या रडारवर आणण्यासाठी प्रदेश भाजपनेच पत्र दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAmit Shahअमित शहाchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाSugar factoryसाखर कारखाने