शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

कांद्याची आवक प्रचंड वाढली; एपीएमसी तुडुंब, शेतकरी अडचणीत, व्यापारीही त्रासले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 06:33 IST

राज्यभर कांद्याचे दर प्रचंड घसरू लागले आहेत. मुंबईमध्ये बुधवारी १४४२ टन आवक झाली. जुना कांदा २ ते ४ रुपये व नवीन ५ ते ८ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे.

नवी मुंबई : राज्यभर कांद्याचे दर प्रचंड घसरू लागले आहेत. मुंबईमध्ये बुधवारी १४४२ टन आवक झाली. जुना कांदा २ ते ४ रुपये व नवीन ५ ते ८ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. राज्यातील अनेक मार्केटमध्ये १ रुपयापेक्षाही कमी दराने विक्री करावी लागत असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे.आवक वाढल्यामुळे मुंबई बाजार समितीमध्ये कांदा ठेवण्यासाठीही जागा मिळेनासी झाली आहे. सर्व गोडाऊन फुल्ल झाली असून लिलावगृहासह धक्क्यांवरही गोणी ठेवाव्या लागत आहेत. जुना कांदा जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत बाजारभाव कमीच राहतील असे मत व्यापारी व्यक्त करू लागले आहेत. मुंबईत चांगला भाव मिळेल या आशेने आलेल्या शेतकºयांना निराश होऊन परत जावे लागत आहे.प्रत्येक वर्षी आॅक्टोबर ते डिसेंबर दरम्यान देशभर कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असतो. दर चांगले मिळतील या आशेने शेतकरी उन्हाळी कांदा चाळींमध्ये साठवून ठेवत असतात. परंतु यावर्षी दिवाळीपासूनच कांद्याचे दर घसरू लागले आहेत. मुंबईमध्ये रोज ७०० ते ८०० टन कांद्याची आवश्यकता असते. परंतु काही दिवसांपासून १ हजार टनपेक्षा जास्त माल विक्रीसाठी येत आहे. बुधवारी तब्बल १४४२ टनची आवक झाली असून त्याचा परिणाम बाजारभावावर होत आहे. होलसेल मार्केटमध्ये जुना कांदा २ ते ४ रुपयांना विकावा लागत आहे. पुणे, अहमदनगर, नाशिकवरून मुंबईमध्ये कांदा वाहतुकीसाठी आलेला व उत्पादनासाठी झालेला खर्चही विक्रीतून मिळेनासा झाला आहे.कांदा सडू लागलाएक महिन्यापासून बाजार समितीमध्ये विक्री न झालेला कांदा सडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. लिलावगृहामध्ये रोज ५० ते १०० गोणी खराब झाल्यामुळे फेकून द्याव्या लागत आहेत. सडलेल्या कांद्यामुळे दुर्गंधी वाढू लागली आहे.बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मागणीपेक्षा पुरवठा जास्त होत असल्यामुळे दर कमी होऊ लागले आहेत. जुना कांदा संपेपर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.- राजेंद्र शेळके, अध्यक्ष, कांदा-बटाटा अडत व्यापारी संघ

टॅग्स :onionकांदाMumbaiमुंबई