शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

खडसे-महाजन यांच्यातील अंतर्गत वाद भाजपाला संपवेल: दिलीप वळसे- पाटील

By admin | Updated: June 16, 2016 16:37 IST

सध्या सत्तेत असलेले भाजपा व शिवसेना हे परस्परांना निजाम व रझाकाराची उपाधी देत आहेत, अशी टीका दिलीप-वळसे पाटील यांनी केली

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. १६ -  सध्या सत्तेत असलेले भाजपा व शिवसेना हे परस्परांना निजाम आणि रझाकाराची उपाधी देत असून जळगाव जिल्ह्यात तर माजी मंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात वाद सुरु आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ सरकारविरोधात असंतोष निर्माण करून जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे प्रभारी व माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दुपारी झालेल्या या मेळाव्यात ते बोलत होते. शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेण्यासाठी पंतप्रधानांना वेळ नाहीमहाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा भाग असलेला मराठवाडा दुष्काळामुळे होरपळत आहे. पक्षाचे नेते शरद पवार यांनी मराठवाड्यात जाणून शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेतले आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात ४० प्रचारसभा घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेण्यास महाराष्ट्रात येण्यासाठी वेळ नाही. सुरुवातीला बाबरी मशिद आणि राममंदिर उभारणीचा मुद्दा भाजपातर्फे उपस्थित करण्यात आला होता. आता हिंदू- मुस्लीम वाद उभा करीत मुस्लिम मुक्त राष्ट्राच्या घोषणा भाजपाच्या काही नेत्यांकडून सुरु आहे. पंतप्रधान किंवा भाजपाचे वरिष्ठ नेते मात्र याबाबत मौन धारण करून आहेत.