वाशीमधील लेडीज बार प्रकरणावरुन रामदास कदमांनी पोलिसांवर केला आरोप, म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 17:21 IST2025-08-04T17:20:37+5:302025-08-04T17:21:56+5:30
अनिल परब यांनी नियमबाह्यपणे विधिमंडळात हा विषय काढल्याचाही केला आरोप

वाशीमधील लेडीज बार प्रकरणावरुन रामदास कदमांनी पोलिसांवर केला आरोप, म्हणाले..
खेड : वाशीमधील लेडीज बार बंद केल्याने बदनामी करण्याचे काम सुरू आहे. हे थांबविण्यासाठी पाेलिसांनी फाेनही केले. मात्र, हे थांबवले नाही म्हणून हेतुपुरस्सर बदनाम करण्यासाठी काही पोलिसांनी केलेले हे कारस्थान असल्याचा आराेप माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी रविवारी खेड येथे पत्रकार परिषदेत केला.
सावली बारवरून सुरू असलेल्या वादाबाबत त्यांनी सांगितले की, आम्ही करार रद्द करून हॉटेल परवाने १३ जून राेजी जमा केले आहेत आणि अनिल परब यांनी १८ जुलै राेजी हा विषय विधिमंडळात काढला. अनिल परब यांनी नियमबाह्यपणे विधिमंडळात हा विषय काढल्याचा आराेप त्यांनी केला आहे.
वाशीमधील लेडीज बारवरील कारवाईनंतर पाेलिसांनी ‘हे तुम्ही थांबवा,’ म्हणून फाेन केले हाेते; पण हे थांबले नसल्याने पाेलिसांनीच बदनामीचे कारस्थान रचल्याचा आराेप त्यांनी केला. या पाेलिसांचा शाेध घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.