शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री-आमदारांना संघविचारांचे बौद्धिक

By admin | Updated: December 19, 2014 00:54 IST

विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेले भाजपचे आमदार व मंत्र्यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागस्थित स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र

संघ स्मृतिमंदिरात ‘ओळखपरेड’ : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले मार्गदर्शननागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेले भाजपचे आमदार व मंत्र्यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागस्थित स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अनेक मंत्रीदेखील उपस्थित होते. संघाचे जेष्ठ पदाधिकारी शहरात नसल्याने यावेळी नवीन आमदारांची स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर ‘ओळख परेड’ झाली. शिवाय त्यांना संघ विचारधारेसंदर्भात बौद्धिकदेखील घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. संघातर्फे डिसेंबरच्या सुरुवातीलाच मंत्रिमंडळासाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु यामुळे नवीन वाद निर्माण होऊ नये म्हणून ऐनवेळी हा वर्ग रद्द करण्यात आला. अखेर शुक्रवारचा मुहूर्त संघस्थानाच्या भेटीसाठी निश्चित करण्यात आला. शुक्रवारी सकाळी ८.३० नंतर आमदार व मंत्री स्मृतिमंदिर परिसरात येण्यास सुरुवात झाली. संघभूमीत ‘फोटोसेशन’ करण्याचा उत्साहअनेक आमदारांची संघ स्मृतिमंदिर परिसरास प्रथमच भेट दिली. अनेकांना संघाच्या नेमक्या कामकाज प्रणालीची माहिती नव्हती. या सर्वांमध्ये त्यामुळे प्रचंड उत्सुकता दिसून येत होती. सकाळच्या थंडीतदेखील अनेकांनी आवर्जून ‘फोटोसेशन’ करून घेतले. शिवाय संघ स्वयंसेवकांप्रमाणे स्वहस्तेच शिस्तीत रांग लावून नाश्ता घेतला.मंत्र्यांचीदेखील उपस्थितीसंघ स्मृतिमंदिराला भेट देणाऱ्यांमध्ये मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांचादेखील समावेश होता. यात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आदी उपस्थित होते.