शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

युजीसी देणार महाविद्यालयीन परीक्षांबाबत निर्देश; सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 20:16 IST

विद्यापीठ व महाविद्यालयीन स्थरावरील परीक्षा कोणत्या पध्दतीने व कशा घ्याव्यात यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही

ठळक मुद्देराज्यपाल नियुक्त समितीही युजीसीच्या नियमावलीच्या प्रतीक्षेत 

 पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.मात्र, या परीक्षांबाबतसोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा केली जात आहे.परंतु,विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी ) समितीकडून यासंदर्भात अभ्यास केला जात असून या समितीने दिलेल्या अहवालानंतर युजीसीकडून प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार सर्व परीक्षा घेतल्या जाणार आहेत.कोरोनाचा फौलाव रोखण्यासाठी देशातील शाळा, महाविद्यालयांना व विद्यापीठांना सुट्टी देण्यात आली.तसेच राज्यातील पहिली ते  करावी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.मात्र, विद्यापीठ व महाविद्यालयीन स्थरावरील परीक्षा कोणत्या पध्दतीने व कशा घ्याव्यात यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.परंतु, विद्यापीठ व महाविद्यालयांच्या परीक्षा कशा घ्याव्यात, याबाबत अहवाल देण्यासाठी राज्यपालांच्या सूचनेनुसार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, एसएनडीटी विद्यापीठांच्या कुलगुरु शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची समिती समिती स्थापन करण्यात आली आहे.या समितीने ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबत अहवाल दिल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे. परंतु,अद्याप या समितीने असा कोणताही अहवाल तयार केलेला नाही. तसेच युजीसीकडून पुढील काळात परीक्षा कशा घ्याव्यात याबाबतचे निर्देश प्राप्त होणार असल्याने या समितीने आपले काम काही कालावधीसाठी थांबवले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. परिणामी महविद्यालयीन परीक्षा विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार किंवा एखाद्या समितीच्या अहवालानुसार होणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे, आवाहन विद्यापीठातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने केले आहे. दरम्यान, विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेचा विचार करू नये, असे मत ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ.अरूण अडसूळ यांनी केले आहे.कारण ऑनलाईन परीक्षा घेण्यास विद्यापीठाकडे पायाभूत सुविधा उपलब्ध नाही.तसेच ऑनलाईन परीक्षेसाठी आपला अभ्यासक्रम पुरक नाही.एकवेळ राज्यपाल किंवा शासन आदेशानुसार काही तडजोड करून परीक्षा घेणे शक्य आहे.परंतु, ऑनलाईन परीक्षा योग्य नाही, असेही अडसूळ म्हणाले.---------राज्यपाल नियुक्त समितीने दिलेला अहवाल आणि युजीसीकडून परीक्षेबाबत प्राप्त होणाऱ्या सूचना यात विरोधाभास निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे युजीसीकडून प्राप्त होणानियमावलीनुसारच परीक्षा घेतल्या जाणार आहेत.तसेच पुढील शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू केले पाहिजे,यावरही युजीसी काम करत आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाSocial Mediaसोशल मीडियाStudentविद्यार्थीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस