शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

Virar Covid hospital Fire: दुर्घटनेसंदर्भातील चौकशी समितीच्या सूचना अमलात आणल्या जाणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 5:17 AM

Virar Covid hospital Fire: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेसंदर्भातील चौकशी समिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेमली असून त्या चौकशी समितीने केलेल्या शिफारशी अमलात आणल्या जाणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या आयसीयू कक्षाला लागलेल्या आगीची पाहणी शुक्रवारी संध्याकाळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. त्या वेळी पत्रकारांशी झालेल्या चर्चेवेळी महसूलमंत्री थोरात बोलत होते.जिल्हा प्रशासन सतर्क असून पूर्ण क्षमतेने काम करत आहे. जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कोरोनाशी दिवस-रात्र लढत आहे. प्रशासनावर या काळात प्रचंड ताण असला तरी भविष्यात अशा दुर्घटना घडणार नाहीत याची काळजी जिल्हा प्रशासन घेईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी प्रशासन नियोजनबद्ध काम करेल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

अशी आहे चौकशी समितीविजय वल्लभ रुग्णालयातील आगीच्या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ अध्यक्ष असलेल्या या समितीत महापालिका आयुक्त गंगाथरन डी., जिल्हा वैद्यकीय अधिकारी दयानंद सूर्यवंशी, पोलीस उपायुक्त संजय पाटील आणि वसई-विरार महापालिका अग्निशमन अधिकारी दिलीप पालव यांचा समावेश आहे. समितीने १५ दिवसांत चौकशी अहवाल सादर करायचा आहे.

पंतप्रधानांकडून तीव्र दु:खपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अग्नितांडव घटनेची माहिती घेऊन तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांना दोन लाख व जखमींसाठी ५० हजार रुपयांची मदत ट्विटरवरून जाहीर केली.

गृहमंत्र्यांकडून शोक व्यक्तदेशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात घडलेल्या आगीच्या दुर्घटनेची आणि त्यात १५ जणांच्या झालेल्या मृत्यू बाबतीत तीव्र शोक व्यक्त केला आहे. 

जखमींची योग्य काळजी प्रशासन घेतेय - पालकमंत्री 

वसई : विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील घटना अत्यंत दुर्दैवी असून, अशा घटना भविष्यात यापुढे घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत, तसेच या घटनेतील जखमींची जिल्हा प्रशासन योग्य काळजी घेत आहे, असे कृषी, माजी सैनिक कल्‍याणमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी विरार येथे घटनास्थळी भेटी वेळी ‘लोकमत’ला सांगितले.

वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील विजय वल्लभ हॉस्पिटल, तिरुपती फेज-१, विरार (प.) या ४ मजली रुग्णालयामध्ये रात्री ३:१३च्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागून १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तातडीने पालकमंत्री भुसे घटनास्थळी दाखल झाले.विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात होते. सदर रुग्णालयात एकूण ९० कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. इतर रुग्णांनादुसऱ्या रुग्णालयांमध्ये तत्काळ हलविण्यात आले असून, प्रशासन त्यांची काळजी घेत आहे, असे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातfireआगcorona virusकोरोना वायरस बातम्या