शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

प्रेरणादायी! गणेशोत्सवाच्या निधीतून औरंगाबादमध्ये उभारले २० खाटांचे कोविड सेंटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 13:46 IST

CoronaVirus कोरोना विषाणूने औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या रुग्णांचा ताण मनपाच्या व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सेवेवर पडत आहे.

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आरोग्य व्यवस्थेवर अवलंबून न राहता सिडको एन-१ परिसरातील ब्ल्यू बेल सोसायटीने कोरोनाशी दोन हात करण्यासाठी इमारत परिसरातच २० खाटांचे कोविड सेंटर अर्थात विलगीकरण कक्ष तयार केले आहे. सोसायटीतील सदस्य बाधित झाल्यास त्याच्यावर याच सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत. ब्ल्यू बेल सोसायटीने राबविलेला हा उपक्रम इतर सोसायटींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. 

कोरोना विषाणूने औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या रुग्णांचा ताण मनपाच्या व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सेवेवर पडत आहे. त्यातच सोसायटीतील दोन सदस्य कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्यामुळे ब्ल्यू बेल सोसायटीतील सदस्यांनी एकत्र येत नगरसेवक राजू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली २० खाटांचे विलगीकरण कक्ष स्थापन करण्याबाबत हालचाली सुरू केल्या. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळविण्यात आले. सोसायटीत जवळपास २०० कुटुंबे वास्तव्यास आहेत. एकूण सदस्यांचा विचार केला, तर ही संख्या ८०० च्या घरात जाते. यात चार ते पाच डॉक्टर कुटुंबेही राहतात. त्यामुळे त्यांचेही सहकार्य या उपक्रमाला मिळत आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी संकलित केलेल्या निधीतून हा वैद्यकीय उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

 

जागतिक आरोग्य संघटनेचे निकष पूर्ण करून हे सेंटर उभारले आहे. आगामी दोन महिने कालावधीसाठी २० खाटा भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या आहेत. उर्वरित ३० ते ३५ हजार रुपये खर्चून बेडशीट, पीपीई कीट, वैद्यकीय उपकरणे आदी साहित्य विकत आणण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची काळजी घेणारी राज्यातील ही एकमेव सोसायटी ठरली आहे. इतर सोसायट्यांनी अशा प्रकारचा वैद्यकीय उपक्रम सुरू केला, तर आरोग्य विभागावरील ताणही कमी होणार आहे. 

विलगीकरण कक्षात राहणार या सुविधाआॅक्सिजन, पीपीई कीट, सॅनिटाईज्ड बेडस्, मास्क, उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र खोली, बेड व बाथरूमची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याप्रमाणे स्वतंत्र स्वयंपाकघर तयार केले आहे. यामध्ये फ्रीज, मायक्रोओव्हन, सिलिंडर, टीव्ही आदी साहित्य आहे. 

 

घरातील एखादा सदस्य बाधित आढळला, तर महिलांची धावपळ उडते. या विलगीकरण कक्षामुळे महिलांना मानसिक आधार मिळाला आहे. रुग्णाला घरचा डबा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णाची विशेष काळजी घेतली जाणार असल्याने बाधित रुग्णाच्या कुटुंबाला मानसिक बळ मिळणार आहे. -शैलेश कासलीवाल, सदस्य, ब्ल्यू बेल सोसायटी

अन्य महत्वाच्या बातम्या....

दंग्याचा त्रास होत होता; शेजाऱ्याच्या दोन मुलांना चौथ्या मजल्यावरून फेकले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरेंच्या वडिलांचे निधन

जग दुसऱ्या मोठ्या महामारीच्या उंबरठ्यावर; सिंहाच्या हाडांपासून औषध, मद्याची निर्मिती घातक

CoronaVirus जून-जुलै नाही, नोव्हेंबर धोक्याचा! कोरोना उत्पात माजवणार; ICMR चा अंदाज

धक्कादायक! कोरोना पसरण्याच्या भितीने IRS शिवराज सिंहांची आत्महत्या

वाह प्रेमजी! दिलेल्या शब्दाला जागले; आयटी कंपनीला कोरोना हॉस्पिटल बनवले

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याcidco aurangabadसिडको औरंगाबादGaneshotsavगणेशोत्सवPositive on Coronaसकारात्मक कोरोना बातम्या