दंग्याचा त्रास होत होता; शेजाऱ्याच्या दोन मुलांना चौथ्या मजल्यावरून फेकले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 12:50 PM2020-06-15T12:50:47+5:302020-06-15T12:51:41+5:30

रविवारच्या संध्याकाळी बुधानाची मुले शिवकुमारच्या दरवाजासमोर खेळत होती. यावेळी त्यांचा बॉल शिवकुमारच्या दरवाजावर काहीवेळा आदळला.

neighbor's childs were thrown from the fourth floor of chawl; 1 died, 1 serious | दंग्याचा त्रास होत होता; शेजाऱ्याच्या दोन मुलांना चौथ्या मजल्यावरून फेकले

दंग्याचा त्रास होत होता; शेजाऱ्याच्या दोन मुलांना चौथ्या मजल्यावरून फेकले

Next

कोलकाता : पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये एक हैरान करणारी घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीने शेजाऱ्याच्या दोन मुलांना चौथ्या मजल्यावरून खाली फेकले. कारण एवढेच होते, की ही मुले घराबाहेरील जागेत दंगा करत होती. त्यांच्या आवाजामुळे या व्यक्तीला त्रास होत होता. रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले आहे.  


यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बडे बाजार भागात ही घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, एनएस रोडवरील नंदराम मार्केटमध्ये एक शंभर वर्षे जुनी चाळ आहे. या चाळीमध्ये शिवकुमार गुप्ता आणि बुधाना शाह हे भाड्याने राहतात. बुधाना हा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो. त्याला एक दीड वर्षांचा आणि दुसरा सात वर्षांचा मुलगा आहे. मुलांवरून बुधाना आणि शिवकुमारमध्ये नेहमी भांडणे होत होती. 


हार्डवेअरचे दुकान चालविणाऱ्या शिवकुमारने सांगितले की, मी अनेकदा बुधानाच्या कुटुंबाला मुलांना माझ्या दरवाजासमोर खेळायला देऊ नका असे बजावले होते. ही मुले दरवाजाबाहेर गोंधळ, मोठमोठ्याने ओरडत असल्याने त्रास होत होता. भांडणावेळी शिवकुमारने मुलांना खेळण्यापासून रोखले नाही तर त्यांना एक दिवस बाल्कनीतून खाली फेकून देईन अशी धमकी दिली होती. मात्र, बुधानाने ही बाब फारशी मनावर घेतली नाही. तिथेच घात झाला. 


रविवारच्या संध्याकाळी बुधानाची मुले शिवकुमारच्या दरवाजासमोर खेळत होती. यावेळी त्यांचा बॉल शिवकुमारच्या दरवाजावर काहीवेळा आदळला. तसेच बॉल आदळल्याने घराची बाहेरील भिंतही खराब होत होती. यामुळे शिकुमारला राग आला. रागाच्या भरात त्याने मुलांना बाल्कनीमधून खाली फेकून दिले. मात्र, नंतर त्याला मुलांना खाली फेकल्याचा पश्चात्ताप झाला. 


लोकांनी सांगितले की, जोरजोरात आवाज ऐकला तेव्हा सर्वांनी खाली धाव घेतली. आम्ही पाहिले की, दीड वर्षांचा मुलगा शिवम रस्त्यावर निपचित पडला आहे. तर सात वर्षांचा मुलगा विशाल एका दुकानाच्या पत्र्यावर पडला होता. त्याची मान एका तारेमध्ये अडकली होती. रंजीत सोनकर या स्थानिक रहिवाशाने सांगितले की, जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा मुलांच्या शरीरातून खूप रक्त येत होते. आम्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी उचलले पण शिवमचा मृत्यू झाला होता. मात्र, तरीही आम्ही दोघांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. 

अन्य महत्वाच्या बातम्या....

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरेंच्या वडिलांचे निधन

जग दुसऱ्या मोठ्या महामारीच्या उंबरठ्यावर; सिंहाच्या हाडांपासून औषध, मद्याची निर्मिती घातक

CoronaVirus जून-जुलै नाही, नोव्हेंबर धोक्याचा! कोरोना उत्पात माजवणार; ICMR चा अंदाज

धक्कादायक! कोरोना पसरण्याच्या भितीने IRS शिवराज सिंहांची आत्महत्या

वाह प्रेमजी! दिलेल्या शब्दाला जागले; आयटी कंपनीला कोरोना हॉस्पिटल बनवले

Web Title: neighbor's childs were thrown from the fourth floor of chawl; 1 died, 1 serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.