वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 06:53 IST2025-08-26T06:52:49+5:302025-08-26T06:53:16+5:30
Irkar family: कर्नाटक सीमेवरील अनंतपूरच्या इरकर वस्तीवरील तुकाराम इरकरसह २० जणांना ८ सप्टेंबरला वैकुंठवासी होण्याच्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे. सध्या कुटुंब नजरकैदेमध्ये असून, बंदोबस्त आहे.

वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
अथणी (बेळगाव) - कर्नाटक सीमेवरील अनंतपूरच्या इरकर वस्तीवरील तुकाराम इरकरसह २० जणांना ८ सप्टेंबरला वैकुंठवासी होण्याच्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे. सध्या कुटुंब नजरकैदेमध्ये असून, बंदोबस्त आहे. इरकर यांनी वैकुंठाला जाण्याचा हट्ट कायम ठेवला आहे.
सध्या पुण्याहून आलेल्या भक्तांना शासकीय यंत्रणा व पोलिस यंत्रणेने परत पुण्याला पाठविण्याची व्यवस्था केली आहे. सध्या फक्त पाच भक्त इरकर कुटुंबातील आहेत. सर्वजण दररोज सकाळी चतकोर चपाती पाण्यामध्ये भिजवून खात आहेत. त्यांची प्रकृती क्षीण झाली आहे.
भक्तीत मग्न, घर रिकामे
इरकर कुटुंब सध्या भक्तीमध्ये मग्न आहे. संपूर्ण घर रिकामे आहे. महाराजांच्या खुर्चीसमोर एक पुस्तक असून प्रत्येक तासाला लोटांगण घालत आहेत. अथणी तालुक्यातील अनेक गावांतील लोकांनी त्यांना यापासून परावृत्त होण्याची विनवणी केली आहे.