वोरा हत्येप्रकरणी कुकच्या मुलाची चौकशी सुरु
By Admin | Updated: June 10, 2016 04:58 IST2016-06-10T04:58:27+5:302016-06-10T04:58:27+5:30
माटुंग्यात राहणाऱ्या मंजुलाबेन वोरा (७८) यांचा मारेकरी अजूनही मोकाट

वोरा हत्येप्रकरणी कुकच्या मुलाची चौकशी सुरु
मुंबई : माटुंग्यात राहणाऱ्या मंजुलाबेन वोरा (७८) यांचा मारेकरी अजूनही मोकाट असून त्याला पकडण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. मात्र तिथे काम करणाऱ्या कुकच्या मुलाची चौकशी सुरु आहे. माटुंगा पोलीस ठाण्यातील एक पथक अधिक तपास करत आहेत.
माटुंगा येथील प्रणव रेसीडेंसीमधील पाचव्या मजल्यावर मंजुला वोरा (७८) या मानसिक रुग्ण असलेल्या भावासोबत राहायच्या. सोमवारी सायंकाळच्या सुमारास घरात घुसलेल्या मारेकऱ्याने त्यांची निर्घृण हत्या केली होती. (प्रतिनिधी)