शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

वीज अनुदानातही विदर्भावर अन्याय

By admin | Updated: December 22, 2014 00:44 IST

सिंचन, कृषी पंप, रस्ते विकासात विदर्भावर अन्याय होत असताना शासनाकडून मिळणाऱ्या वीज अनुदानाचा फायदा घेण्यातही विदर्भ मागे राहिला आहे.

केवळ १४ टक्के लाभ : नागपूर विभागात ४.२१ टक्केकमल शर्मा - नागपूरसिंचन, कृषी पंप, रस्ते विकासात विदर्भावर अन्याय होत असताना शासनाकडून मिळणाऱ्या वीज अनुदानाचा फायदा घेण्यातही विदर्भ मागे राहिला आहे.विशेष म्हणजे विदर्भात वीज निर्मितीचे मोठे प्रकल्प आहेत. महाजनकोची ४० टक्के वीज या भागातच तयार होते. पण फक्त १४ टक्केच अनुदानाचा लाभ या भागाला मिळतो.शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी पंपासाठी दीड रुपया प्रती युनिट या दराने वीज दिली जाते. यासाठी सरकार वर्षाला ३३६९.१४ कोटी रुपयाचे अनुदान देते. याचा लाभ विदर्भाला कमी आणि इतर भागांना अधिक होताना दिसून येतो. एकूण अनुदानाच्या ३२.१६ टक्के (१०८३.३८ कोटी रुपये) वाटा पुणे विभागावर खर्च होतो तर २९.३८ टक्के वाटा (९८९.८० कोटी रुपये) नासिक विभागाला मिळतो. अनुदानाची अर्ध्यापेक्षा जास्त रक्कम ही या दोनच विभागांवर खर्च होते. दुसरीकडे विदर्भाला १४ टक्के तर मराठवाड्याला २३.८४ टक्के लाभ मिळतो. विदर्भ विकास मंडळाच्या अहवालानुसार नागपूर विभागात १४१.७९ कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. ही रक्कम एकूण अनुदानाच्या ४.२१ टक्के आहे. अमरावती विभागाची अवस्था तुलनेने थोडी बरी आहे. या भागातील शेतकऱ्यांना ३२६.३० कोटी (९.३९ टक्के)चा लाभ मिळतो. विदर्भात वीज वापर कमी आहे. त्यामुळे अनुदानाची रक्कमही कमी खर्च होते, असा महावितरणचा तर्क आहे. पण गत ६० वर्षात विदर्भात मागणी करूनही वीज पंपासाठी विद्युत पुरवठा केला गेला नाही. विदर्भात ४,२६,८९३ कृषी पंपाचा अनुशेष आहे. ५० हजार शेतकऱ्यांनी पैसे भरूनही जोडणी मिळाली नाही. येत्या मार्च २०१५ पर्यंत या शेतकऱ्यांना जोडण्या देऊ, असे आता महावितरण सांगते.शिफारशींकडे दुर्लक्ष अनुशेष असणाऱ्या जिल्ह्यात प्राधान्याने वीज जोडण्या दिल्या नंतर अन्य जिल्ह्यांचा विचार करावा, अशी स्पष्ट शिफारस दांडेकर समितीने केली असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल मंडळाच्या अहवालात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.