शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार

By admin | Updated: September 24, 2015 02:12 IST

एकात्मतेबरोबरच सामाजिक दातृत्वाचा अनोखा उपक्रम येथील मुस्लिम समाजातील धर्मगुरु समजल्या जाणाऱ्या मौलवींची संघटना व जमयित-ए-उलेमा, सोशल एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर असोसिएशन

जमीर काझी ल्ल मुंबई एकात्मतेबरोबरच सामाजिक दातृत्वाचा अनोखा उपक्रम येथील मुस्लिम समाजातील धर्मगुरु समजल्या जाणाऱ्या मौलवींची संघटना व जमयित-ए-उलेमा, सोशल एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर असोसिएशन (सेवा) व असोसिएशन्स आॅफ मुस्लिम प्रोफेशनल्स (एएमपी) या संस्थांतर्फे राबविला जात आहे. राज्यातील दुष्काळग्रस्तांना आर्थिक आधार देण्यासाठी मौलवी स्वत: हातभार लावणार आहेत. दुष्काळग्रस्तांना मदतीचे आवाहन मुंबईतील लाखो बांधवांनाही करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी (२५ सप्टेंबर) साजऱ्या होणाऱ्या ईद-ऊल अज्हा (बकरी ईद) पार्श्वभूमीवर त्यासाठी देणगी गोळा केली जाणार आहे.ईदच्या नमाज पठणानंतर मुंबईतील सुमारे शंभराहून अधिक मशीदींतून दुष्काळग्रस्तासाठी मदत गोळा केली जाईल. त्याचप्रमाणे त्यासाठी स्वतंत्र बँक खाते उघडून देणगीसाठी आवाहन करण्यात येत आहे. यातून जमणारा निधी बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्या व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ आॅक्टोबर रोजी वितरीत केला जाणार आहे. त्याबाबत मंगळवारपासून मुस्लिम समाजातील विविध घटकांमध्ये कार्यशाळा घेवून मदतीबाबत आवाहन केले जात आहे. याबाबत बोलताना ‘सेवा’चे अध्यक्ष अ‍ॅड. युसूफ अब्राहनी म्हणाले, शासकीय मदतीला मर्यादा असल्याने माणुसकीच्या नात्याने त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेचे ४ हजारावर सक्रिय सभासद आहेत. प्रत्येक जण ५ हजारांपासून लाखापर्यंत शक्य तितकी रक्कम जमा करणार आहेत. देणगीची संबंधितांना रितसर पावती दिली जाईल. जमियत-उलेमाचे अध्यक्ष मौलवी मुस्तिकीम आझमी म्हणाले,‘समाजातील दीन, दलित व गरजूंना मदत करण्याचे आदेश पवित्र ग्रंथ कुराण व प्रेषित महंमद पैगंबर यांनी दिले आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेल्यांना धर्म, जातभेद विसरुन अर्थसहाय्य उभे केले जाईल. ईदच्या नमाजपठणानंतर त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना (दुवा) करण्याबरोबरच मशिदीतून मदत गोळा केली जाणार आहे. ‘एपीपी’चे अध्यक्ष अमीर इद्रसी म्हणाले, ‘संस्थेचे राज्यात २ हजारांवर सभासद आहेत. ते स्वत:च्या खिशातून मदत देण्याबरोबरच समाजातील विविध घटकांकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत मिळवित आहेत. स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडूनही गरजूंबाबत माहिती मिळविली जात आहे.