'Indurikar Maharaj, you are doing good work, just do one thing Says Hameed Dabholkar | 'इंदुरीकर महाराज, तुम्ही चांगलं काम करताय, फक्त 'ही' एक गोष्ट नक्की करा!

'इंदुरीकर महाराज, तुम्ही चांगलं काम करताय, फक्त 'ही' एक गोष्ट नक्की करा!

मुंबई - गर्भलिंग निदानावर भाष्य केल्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. अनेक माध्यमातून इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकणाऱ्या तरुणाईमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ आहे. काही जणांनी इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर मोहीमदेखील सुरु केली होती. गर्भलिंग निदान प्रकरणावर केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली. 

या संपूर्ण प्रकरणावर लोकमतशी बोलताना अंनिसचे नरेंद्र दाभोळकर यांचे चिरंजीव हमीद दाभोळकर म्हणाले की, इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर अनेक चर्चा सुरु आहे, त्यांनी जे विधान केले हे तर अशास्त्रीय स्वरुपाचं विधान आहे. मुलाचं आणि मुलीचं लिंग असं ठरत नाही हे विज्ञानाने स्पष्ट केलं आहे. महिलांबद्दल त्यांचे बोलणं अनेकदा आक्षेपार्ह म्हणलं जाऊ शकतं असं त्यांनी सांगितले. 

आय सपोर्ट इंदुरीकर महाराज... 'तमाशापुढं बसणारा आज किर्तनाला बसतोय'

पण एकाबाजूला कायदेशीररित्या काही गोष्टी गुन्हा होत असल्यातरी इंदुरीकर महाराज त्यांच्या कीर्तनामध्ये समाज प्रबोधनाच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी मांडतात. आणि आपल्यामध्ये एखादी चूक असेल ती दुरुस्ती करुन घेणे यात कोणताच कमीपणा नाही. त्यांनी ही चूक दुरुस्त करुन घ्यावी, यापुढे येणाऱ्या काळात एवढा मोठा समुदाय त्यांचे किर्तन ऐकतो, त्यांना विज्ञान नीट समजून सांगाव, स्त्री-पुरुष समतेचं मुल्य समजून सांगावं. त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातून अनेक लोकांना गैरसमजातून बाहेर काढण्याची त्यांना संधी मिळाली आही. ही संधी त्यांनी घ्यावी असं आवाहन हमीद दाभोळकरांनी केलं आहे. 

इंदुरीकर महाराज म्हणतात; 'कीर्तन सोडून शेती करेन; खूप मनःस्ताप झाला!'

कीर्तनच्या माध्यमातून अनेक विषयांवर इंदुरीकर महाराज परखड मत व्यक्त करतात. मुला-मुलींच्या जन्माबाबत केलेल्या विधानावरून वादात साडपले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या सर्व प्रकारानंतर इंदुरीकर महाराज उद्विग्न झाले. दोन तासांच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे काही बोललो, ते चुकीचं नाहीच. मी बोललेलं अनेक ग्रंथात नमूद आहे, असा खुलासाही इंदुरीकर महाराजांनी केला आहे. 

इंदुरीकर म्हणाले, वादाचा मला व माझ्या कुटुंबीयालाही त्रास; शूटिंगलाही घातली बंदी

वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि कीर्तन सोडून शेती करेन,' अशी भावनाच इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केली होती. मी कशात सापडेना म्हणून मला नको त्या प्रकरणात गुंतवण्याचा आटापिटा सुरू आहे. मी आता एका वेगळ्या निर्णयाप्रत आलेलो आहे. आता लय झालं. एखाद-दुसरा दिवस जाऊ द्यायचा. फेटा ठेवून द्यायचा. आपली सहन करायची कॅपॅसिटी संपलेली आहे असं विधान इंदुरीकर महाराजांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या

इंदुरीकर महाराजांच्या 'त्या' कीर्तनावरून गोंधळ; व्हिडीओ व्हायरल, चौकशीची शक्यता

अग्निकल्लोळ... मुंबईत जीएसटी भवनच्या आठव्या मजल्यावर भीषण आग

'कोरेगाव-भीमा प्रकरणी आमची भूमिका स्पष्ट; राज्य सरकार SIT मार्फत समांतर चौकशी करणार'

तुम्ही वडिलांच्या नावावर पक्षात आलात, काँग्रेसच्या महिला नेत्याचा मिलिंद देवरांवर आरोप

देवेंद्र फडणवीस यांना अजूनही पराभव पचवता आला नाही : अशोक चव्हाण

Web Title: 'Indurikar Maharaj, you are doing good work, just do one thing Says Hameed Dabholkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.