शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

शिक्षकांसंदर्भात केलेल्या 'त्या' विधानावरून इंदुरीकर महाराज पुन्हा वादात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 11:34 AM

सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असतात.

अहमदनगर: सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असतात. अनेकदा ते समाज प्रबोधन करताना अनेक ज्वलंत विषयांनाही हात घालतात. त्यांच्या खास विनोदी व हजरजबाबी शैलीमुळं ते संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. त्यांच्या कीर्तनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. इंदुरीकर महाराज यांनी शिक्षक शाळेत कसा वेळ वाया घालवतात यावर बोट ठेवलं आहे. त्यांची ती क्लिप वाऱ्यासारखी पसरली आहे.34 मिनिटांच्या तासिकेत शिक्षक हे पाच मिनिटं वर्गात प्रवेश करण्यासाठीच घेतात. वर्गात गेल्यानंतर फळा पुसायला पाच मिनिटं आणि आदल्या दिवशी काय झालं ते सांगायला पाच मिनिटं घेतात. हे सगळं झाल्यावर उद्याच्या तासाला काय शिकवणार हे सांगायलाही पाच मिनिटं घेतात. मग तास संपला हे सांगायची वेळ येते, असा त्यांचा क्रम सुरूच असतो. त्यांच्या या 'शिकवणी'मुळं शिक्षक संघटना संतापल्या आहेत.ओझर येथील एका कीर्तनात मुला-मुलीच्या जन्मासंदर्भात विधान केलं होतं. तेव्हाही त्यांच्यावर टीका झाली होती. आता शिक्षकांसंदर्भात केलेल्या विधानावरून ते कोंडीत सापडले आहेत. कठीण गोष्टी कीर्तनातून सांगण्यासाठी कीर्तनकारांकडून अनेकदा जीवनातील उदाहरणं समोर ठेवली  जातात. मात्र ते करत असताना किमान भान बाळगणं गरजेचं आहे. एखाद्याची शोभा होणार नाही याची काळजी संबंधितांनी घ्यायला हवी, शिक्षकांबद्दल बोलताना ते स्वत: एक शिक्षक आहेत हे त्यांनी विसरू नये. त्यांनी शिक्षकांची प्रतिमा मलिन करू नये,' अशी भूमिका शिक्षणतज्ज्ञांनी मांडली आहे. 

टॅग्स :indurikar maharajइंदुरीकर महाराज