शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

राज्यघटनेचा अभ्यासक म्हणून संपूर्ण परिस्थिती पाहून वाईट वाटतं- उल्हास बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 13:56 IST

राज्यपालांनी बहुमत चाचणीचे पत्र पाठवल्यानंतर व्यक्त केलं मत

Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडी विरूद्ध शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गट यांच्यातील सत्तासंघर्ष आता अधिकच तीव्र झाला आहे. आमदारांनी सातत्याने मागणी करूनही शिवसेना मविआ सरकारमधून बाहेर पडली नाही. त्यामुळे शिंदे गट मुंबईत परतला नाही. अखेर मंगळवारी विरोधी पक्ष आणि अपक्ष आमदारांनी मविआकडे बहुमत नसल्याचा दावा केला. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्याच बहुमत चाचणीला सामोरं जाण्यास सांगितलं. याबाबत बोलताना राज्यघटनेचे अभ्यासक उल्हास बापट यांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान, राज्यातील राजकारणाची परिस्थिती 'जैसे थे' (Status Quo) ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ११ जुलैला पुढील सुनावणीपर्यंत हे आदेश देण्यात आले आहेत. असे असताना राज्यपालांकडून बहुमत चाचणीबाबत पत्र दिलं जाणं याबाबत उल्हास बापट यांनी आपले मत व्यक्त केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहे. राज्यपाल पदाचा गैरवापर होत असल्याचे दिसत आहे. राज्यपालांनी मुख्यमत्र्यांच्या सूचनेनुसार वागावे असे सांगितले जाते. त्यामुळे  सत्र बोलावणे आणि सत्र संपवणे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानेच व्हायला हवे. त्यामुळे उद्या बोलावलेले अधिवेशन घटनाबाह्य आहे. राज्यघटनेचा अभ्यासक म्हणून ही संपूर्ण परिस्थिती पाहिली की वाईट वाटतं, असे उल्हास बापट म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याविषयी पत्र पाठवले. विधीमंडळातील बहुमत चाचणी विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे. राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. तसेच शिवसेनेतील बंडखोर आमदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्या मुंबईत पोहोचणार असल्याची माहिती स्वत: एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर सुप्रीम कोर्टात आज काय निकाल येतो हे पाहण महत्वाचं आहे, असेही उल्हास बापट यांनी सांगितले आहे.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMaharashtraमहाराष्ट्रMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे