India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 16:22 IST2025-05-09T16:21:43+5:302025-05-09T16:22:30+5:30

एका निवृत्त हवाई दल अधिकाऱ्याने सांगितले की, शांततेच्या काळात, चौथ्या किंवा पाचव्या सेवेची आवश्यकता असलेली विमाने एचएएलला पाठवली जातात.

India Pakistan Update: Ozer's HAL on 'high alert' for Air Force fighter jets! | India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !

India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !

India Pakistan News: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पूर्ण तयारीची गरज असताना, भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे, त्यामुळे तळावर किंवा बाहेरील कर्मचाऱ्यांना जादा वेळेचे काम बंधनकारक करण्यात आले आहे. दुरुस्तीच्या कामासाठी कमी वेळात निघण्यासाठी अभियंते आणि तंत्रज्ञांना 'सर्वार्थानी सज्ज' राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

देखभाल करण्यासाठी आवश्यक असलेल्या आमच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही कामासाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे आणि प्रवासासाठी आवश्यकता असल्यास काही कर्मचाऱ्यांना तशी सेवा देण्यास तयार राहायला सांगण्यात आले आहे. 

आम्ही आधीच संध्याकाळी ७ ते रात्री ११ दरम्यान, अतिरिक्त शिफ्ट सुरू केली असून गरज पडल्यास आम्ही २४ तास काम करण्यास तयार आहोत, असे एचएएलच्या एका सूत्राने सांगितले. इंजिन, एव्हिओनिक्स आणि इतर प्रमुख नियंत्रण प्रणालींच्या दुरुस्तीसह कमिशन केलेल्या लढाऊ विमानांसाठी एचएएल ही चौथ्या स्तरावरील सेवा आहे. 

पहिल्या दोन सेवा स्क्वाड्रन स्तराच्या आहेत. तिसरी सेवा, ज्यासाठी थोडी जास्त प्रमाणात दुरुस्तीची आवश्यकता असते, ती विविध बेस रिपेअर डेपोमध्ये उपलब्ध आहे. 

एका निवृत्त हवाई दल अधिकाऱ्याने सांगितले की, शांततेच्या काळात, चौथ्या किंवा पाचव्या सेवेची आवश्यकता असलेली विमाने एचएएलला पाठवली जातात. कारण त्यांना पुन्हा दुरुस्त करून आणण्यासाठी वेळ असतो. परंतु आपत्कालीन परिस्थितीत, इंडियन एअर फोर्सकडे अशी सुविधा नाही. आणि म्हणूनच, बैंक-अप कर्मचारी सज्ज ठेवणे ही एक आपत्कालीन स्थितीतीत सामान्य पद्धत आहे.

१९९९ मध्ये दोन महिने नाशिकमध्ये काम

१९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान एचएएलच्या एका निवृत्त कर्मचाऱ्याने पूर्वी सांगितले होते की, तंत्रज्ञ सतत दोन महिन्यांहून अधिक काळ काम करत होते. त्यामुळे नाशिकच्या एचएएलमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक काळ दिली गेलेली सेवा होती. २०१६ मध्ये जेव्हा भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा असाच इशारा देण्यात आला होता. 

आपत्कालीन स्थितीसाठी सज्जता

नाशिकमध्ये एचएएल एसयू-३० आणि मिग प्रकारची लढाऊ विमाने हाताळते, तर सर्व फिक्स्ड विंग फायटर या युरोपियन प्लॅटफॉर्मची विमाने मिराज, जग्वार बेंगळुरूमध्ये हाताळली जातात. सर्व हेलिकॉप्टरची दुरुस्ती बेंगळुरूच्या हेलिकॉप्टर कॉम्प्लेक्समध्ये केली जाते. पण आपत्कालीन परिस्थितीत, विमाने येथे आणता येत नाहीत, म्हणून आपण जाण्यासाठी तयार असले पाहिजे, असे एचएएल अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: India Pakistan Update: Ozer's HAL on 'high alert' for Air Force fighter jets!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.