शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

इंडिया आघाडीला निमंत्रकाची गरज नाही, मुंबईतील बैठकीनंतर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 19:44 IST

आज मुंबईत इंडिया आघाडीची बैठक झाली, यात 13 सदस्यीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.

India alliance meeting mumbai: आज मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक पार पडली. यै बैठकीत आघाडीचा प्रमुख निमंत्रक(संयोजक/समन्वयक) ठरवला जाईल, अशी अपेक्षा होती. पण, याबाबत कुठलाही निर्णय झाला नाही. बैठकीनंतर शिवसेना (UBT) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी याबाबत मोठी माहिती दिली. 

मीडियाशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंना आघाडीच्या संयोजकाबाबत विचारण्यात आले. यावर ते म्हणाले की, सध्या आमच्या इंडिया आघाडीला कुठल्याही समन्वयकाची विशेष गरज नाही. आम्ही परस्पर सहमतीने 13 सदस्यीय समन्वय समिती स्थापन केली आहे. या समितीचे सदस्य आघाडी आणि जागावाटपाबाबत निर्णय घेतील, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. 

या समन्वय समितीमध्ये काँग्रेसचे केसी वेणुगोपाल, राष्ट्रवादीचे शरद पवार, द्रमुकचे एमके स्टॅलिन, शिवसेनेचे संजय राऊत, आरजेडीचे तेजस्वी यादव, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी, आपचे राघव चड्ढा, सपाकडून जावेद खान, जेडीयूचे लल्लन सिंह, जेएमएम चे हेमंत सोरेन, डी राजा, एनसीचे ओमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती यांचा समावेश आहे.

जागावाटपावर लवकरच चर्चा होईलया बैठकीत 2024 ची लोकसभा निवडणूक एनडीएविरोधात एकत्र लढण्याचा ठराव घेण्यात आला आहे. मात्र, या बैठकीत आघाडीतील भागीदारांमध्ये जागावाटपाबाबत एकमत झाले नसून, लवकरच राज्यांतील जागावाटपाबाबत चर्चा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी आघाडीचा 'जुडेगा भारत, जीतेगा इंडिया'चा नाराही देण्यात आला.

 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस