शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

बदलत्या जीवनशैलीमुळे वाढतोय लठ्ठपणा - डॉ. शरद शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 03:46 IST

बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर ‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या दुखापतीवेळी त्यांच्यावर उपचार करणारे, प्रसिद्ध पोटविकारतज्ज्ञ डॉ. शरद शाह यांचा ३१ जुलै रोजी ८२वा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद...

बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर ‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या दुखापतीवेळी त्यांच्यावर उपचार करणारे, प्रसिद्ध पोटविकारतज्ज्ञ डॉ. शरद शाह यांचा ३१ जुलै रोजी ८२वा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद...पोटाच्या विकारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याची नेमकी कारणे काय आहेत?- काही आजार अनुवांशिक असतात, तर काही आजार बदलत्या जीवनशैलीमुळे होतात. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकदा बाहेरचे खाणे, तेलकट, तिखट, गोड खाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे नेहमीपेक्षा पोटाच्या विकारांमध्ये वाढ होत आहे.असे विकार टाळण्यासाठी काय करावे?- शक्यतो घरी बनविलेले जेवण, पदार्थ खाण्यास प्राधान्य द्यावे. सध्याच्या जगात बाहेरचे खाणे पूर्णत: टाळणे अशक्य आहे. त्यामुळे बाहेर खाताना ते पदार्थ पूर्ण शिजलेले व गरम असावेत या दोन बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे. लठ्ठपणा ही गंभीर समस्या आहे. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या समस्येवर लवकरच काही ठोस उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे.लठ्ठपणामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाणे, तेलकट, चरबीचे पदार्थ सातत्याने खाल्ल्याने लठ्ठपणामध्ये वाढ होत आहे. लहान मुलांपासून सर्वांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.पोटाचे विकार होण्याचे प्रमाण काही ठरावीक वयोगटांत जास्त आहे का?- नाही. पोटाचे विकार होण्यामध्ये ठरावीक वयोगट नसतो. लहान मुलांपासून, मध्यमवयीन, ज्येष्ठ नागरिक कोणालाही हे विकार कधीही होऊ शकतात. त्यामुळे प्रतिबंधात्मक काळजी घेणे हे आपल्या हातात असल्याने त्यासाठी जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे. लहान मुलांमध्ये असे विकार होऊ नयेत यासाठी पालकांनी त्यांना खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी लावण्याची गरज आहे.या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान मुंबईत, देशात उपलब्ध आहे की केवळ परदेशात उपलब्ध आहे?- जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान मुंबईत व देशात उपलब्ध झालेले आहे. या तंत्रज्ञानासाठी बाहेरील देशावर अवलंबून राहण्याची कोणतीही गरज उरलेली नाही.या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणाऱ्यांसाठी काही पुस्तके लिहिली आहात का?- प्रिव्हेंटिव्ह मेझर्स फॉर किºहॉसिस आॅफ लिव्हर अ‍ॅण्ड इट्स प्रोगेशन व मॅनेजमेंट आॅफ अ‍ॅक्युट पँक्रायटिटिस ही दोन पुस्तके मी लिहिली आहेत. एका पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या सहकार्यामुळे राजभवनात झाले आहे. याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये मी माझे पेपर्स सादर केले आहेत. या क्षेत्रामध्ये दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत असल्याने डॉक्टरांनी आयुष्यभर विद्यार्थी बनून नवीन ज्ञान मिळवत राहण्याची गरज आहे. मी स्वत: या विषयाबाबत कोणतीही नवीन माहिती आली तर मिळविण्याचा प्रयत्न करीत असतो. मी आयुष्यभर शिकत आहे. सध्या मी काही रुग्णालयांमध्ये प्रॅक्टिस करतो. अनेकदा अत्यंत गुंतागुंतीची समस्या निर्माण झालेले रुग्ण माझ्याकडे पाठवले जातात. मी आता प्रतिबंधात्मक उपचार पद्धतीवर अधिक लक्ष देत आहे.बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावरील उपचारांमध्ये तुमची मुख्य भूमिका होती, त्या वेळचे काही अनुभव?- कुली चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अमिताभ बच्चनला गंभीर दुखापत झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. उपचार सुरू असताना अमिताभजी नेहमी मी पूर्णपणे यातून बरा होईन का? असे विचारत असत. त्यावर तुम्ही नक्कीच पूर्ण बरे व्हाल, असे मी सांगत असे. एकदा असेच संभाषण सुरू असताना ते म्हणाले, मी जर पूर्णपणे बरा झालो नाही, तर मला चित्रपटातील अभिनय सोडून दूध विकण्याचे काम करावे लागेल. त्यावर मी असे काही करण्याची वेळ येणार नसल्याची ग्वाही त्यांना दिली होती. देवाच्या कृपेने त्यांची तब्येत पूर्वीप्रमाणे झाली व त्यानंतर त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आणखी उत्तुंग यश मिळविले.तुम्ही उपचार केलेली काही प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे? त्यांच्यावर उपचार करताना त्यांचा प्रतिसाद कसा असतो?अमिताभ बच्चन, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, अभिनेता हृतिक रोशन, धर्मेंद्र, दाऊदी बोहरा समाजाचे प्रमुख मौलाना यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांवर मी उपचार केले आहेत. यापैकी कोणीही उपचार करताना कुठल्याच प्रकारचा बडेजावपणा दाखविला नाही. नेहमी हसतखेळत वातावरण हलकेफुलके ठेवत त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. अमिताभजींच्या उपचारांवेळी जया बच्चन यांनी मला उद्देशून स्वहस्ताक्षरात एक पत्र लिहिले होते, ते मी जपून ठेवले आहे.तुमची पार्श्वभूमी, घरचे वातावरण, कुटुंबीयांबाबत माहिती?- आमच्या कुटुंबीयांचे मूळ गुजरातमधील विजापूर येथे आहे. आमच्या पूर्वजांनी ३०० वर्षांपूर्वी सांगलीमधील तासगाव येथे स्थलांतर केले. माझे वडील न्यायाधीश असल्याने राज्यात अनेक ठिकाणी वास्तव्य करण्याचा योग आला. माझी पत्नी अरुणा शाह हिचे मला नेहमीच सहकार्य लाभले आहे. सुरुवातीच्या काळात मी व्हिजिटसाठी मुंबईत विविध ठिकाणी जात असे. त्या वेळी माझ्या वाहनाचे सारथ्य माझी पत्नी करीत असे. माझ्या आयुष्यात तिचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. माझ्या वडिलांनी माझ्या क्लिनिकसाठी जागा घेऊन ठेवल्याने मला वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्यामध्ये फारशी अडचण आली नाही. माझा मुलगा डॉ. प्रसन्न हा लठ्ठपणावरील उपचारपद्धतीमध्ये पारंगत आहे. माझी मुलगी मनीषा डाएटिशियन आहे तर दुसरी मुलगी प्रीती हीदेखील डॉक्टर आहे. आमच्या घरात मराठी भाषेत संवाद साधला जातो. ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून मी निवृत्त झालो आहे. १९५७पासून वैद्यकीय व्यवसाय करत आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी अमेरिकेत पदव्युत्तर पदवीसाठी गेलो होतो. अमेरिकेत वैद्यकीय व्यवसाय करण्याची संधीही मिळाली होती; मात्र मी मुंबईतच राहण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत मला मनस्वी समाधान वाटते.शब्दांकन : खलील गिरकर

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स