शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

साखरेमुळे नव्हे, बदलत्या जीवन पद्धतीमुळे वाढतेय मधुमेहाचे प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 12:14 IST

साखर आणि मधुमेहाचा छत्तीसचा आकडा मानला जातो. मात्र, साखर खपापेक्षा मधुमेह वाढीचा वेग दुप्पट आहे.  

ठळक मुद्देदेशात २००० साली ३ कोटी १० लाख ७० हजार मधुमेही, त्यात २०१६ पर्यंत ६ कोटी ३० लाखापर्यंत वाढ

विशाल शिर्के  पुणे : साखर आणि मधुमेहाचा छत्तीसचा आकडा मानला जातो. आरोग्यासाठी जागरुक व्यक्ती देखील साखर संपूर्ण सोडताना दिसत आहेत. मात्र, देशातील दरडोई साखरेचा खप सव्वा टक्क्यांनी वाढत असून, त्या तुलनेत मधुमेहाचे प्रमाण मात्र सव्वासहा टक्क्यांनी वाढत असल्याची आकडेवारी इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिली आहे. तसेच, साखरेमुळे नव्हे तर बदलत्या जीवनपद्धतीमुळे मधुमेह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचा दावा केला आहे.  साखरेचे खाणार त्याला देव देणार...! अशी म्हण एकेकाळी प्रसिद्ध होती. मात्र, कालांतराने साखरेचे खाणार त्याला रोग जडणार अशी भावना निर्माण झाली. वजन कमी करण्यासाठी साखरेला राम राम करणाऱ्यांची संख्या देखील अलिकडे वाढू लागली आहे. अनेक आहार तज्ज्ञ देखील पहिला सल्ला साखरेचे सेवन कमी करण्याचा देतात. मात्र गेल्या दहा वर्षांची आकडेवारी पाहिल्यास देशाचा दरडोई साखरेचा वार्षिक खप हा १८ ते १९ किलो दरम्यान आहे. ब्राझिलचा दरडोई वार्षिक खप सर्वाधिक ५२ किलो इतका आहे.  देशातील मधुमेहाचे प्रमाण हे साखरेच्या खपापेक्षा अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. देशात २००० साली ३ कोटी १० लाख ७० हजार मधुमेही होते. त्यात २०१६ पर्यंत ६ कोटी ३० लाखापर्यंत वाढ झाली. म्हणजेच या काळात मधुमेहींची संख्या दुप्पटीने वाढली. तर, २००० साली असणारा दरडोई साखर खप १५.३ किलोवरुन २०१६मधे १८.८ किलो पर्यंत वाढला आहे. साखरेचे सेवन हे मधुमेहाचे कारण नसल्याचे इस्माचे म्हणणे आहे. बदलती जीवनशैली व आहारामुळे लठ्ठपणा वाढत आहे. व्यायामाचा अभाव असल्याने मधुमेहींच्या संख्येत मोठी वाढ नोंदविल्याचे इस्माचे म्हणणे आहे. इस्माचे अविनाश वर्मा यांनी साखर खप आणि मधुमेहींची संख्या याचे व्यस्त प्रमाण दाखवून देत साखरेला मधुमेहासाठी पूर्णत: दोषी ठरविणे चुकीचे असल्याचे सांगितले आहे.  ---देशात सव्वासात कोटी मधुमेही  देशात २० ते ७० वयोगटातील ८.८ टक्के व्यक्ती या मधुमेहग्रस्त आहेत. देशाची २०१६ अखेरची अंदाजित लोकसंख्या १३२ कोटी इतकी आहे. त्यातील ८२ कोटी ९४ लाख ९१ हजार लोकसंख्या २० ते ७० वयोगटातील आहे. त्या पैकी ७ कोटी २९ लाख ४६ हजार ४०० व्यक्ती मधुमेहाने बाधित आहेत. 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यdiabetesमधुमेहSugar factoryसाखर कारखाने