शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

पुणे शहरात पावसाचा जोर वाढला, अनेक रस्त्यांवर साचले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 3:02 PM

पुणे शहर व परिसरात काल रात्रीपासूनच पावसाने जोर धरला असून उपनगरांमध्ये जोरदार वर्षाव होत आहे.

ठळक मुद्देमंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पुणे वेधशाळेत ९ मिमी पावसाची नोंद झाली होती. पावसाचा जोर वाढल्याने काही धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. 

पुणे, दि. 19 -  पुणे शहर व परिसरात काल रात्रीपासूनच पावसाने जोर धरला असून उपनगरांमध्ये जोरदार वर्षाव होत आहे. त्यामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत. खडकवासला, धनकवडी, कात्रज, सिंहगड रोड परिसरात सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. शहरातही सकाळी अकरा नंतर पावसाची संततधार सुरु आहे. 

मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पुणे वेधशाळेत ९ मिमी पावसाची नोंद झाली होती. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून सिग्नल बंद पडल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. 

पावसाचा जोर वाढल्याने काही धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. उजनी धरणातून १० हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून खडकवासला, घोडनदी धरणातून नदीत पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे़

खडकवासला, सिंहगड, पानशेत, खडकवासला, वरसगाव, टेमघर परिसरात आज सकाळपासून धुवांधार पाऊस सुरू असून ओढे, नाले, नद्या खळखळून वाहत आहेत. रस्त्यावर सखल  ठिकाणी आणि रस्त्यावरील खड्ड्यांमधे साठलेल्या पाण्यामुळे वाहतूक संथ झाली असून वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. 

आज सकाळपासून खडकवासला परिसरात पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला जोर कमी होता. सकाळी साडेदहा नंतर पावसाचा जोरदार सुरवात झाली. सिंहगड, पानशेत, वरसगाव, टेमघर,बाहुली, सांगरूण, कुडजे, खडकवाडी, नांदेड, किरकटवाडी, नांदोशी आदी परिसरात पावसाचा जोर दुपारपर्यंत चांगला होता. दुपारी बारा वाजेपर्यंत वरसगाव येथे आठ मिमी तर खडकवासला येथे सात मिमी पावसाची नोंद झाली होती.