शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशाच्या वयोमर्यादेमध्ये वाढ ; पालकांना दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 18:53 IST

राज्यभरातील अनुदानित, विनाअनुदानित इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा शिशू गटातील २५ टक्के प्रवेश मोफत देणे बंधनकारक आहे...

ठळक मुद्देअर्ज भरण्यास ३० मार्च पर्यंत मुदतवाढ या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ५ मार्च पासून सुरू पुणे जिल्हयात प्रवेशासाठी १६ हजार ५९४ जागा उपलब्ध

पुणे : शिक्षण हक्क कायद्यााअंतर्गत (आरटीई) वंचित व दुर्बल घटकांतील २५ मोफत प्रवेशासाठी वयाची कमाल मर्यादा ७ वर्षे २ महिने २९ दिवस करण्यात आली आहे. आरटीईअंतर्गत इयत्ता पहिलीसाठी शाळांकडून प्रवेश दिले जातात. या प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत २२ मार्च रोजी संपणार होती, त्याला आता ३० मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  राज्यभरातील अनुदानित, विनाअनुदानित इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा शिशू गटातील २५ टक्के प्रवेश मोफत देणे बंधनकारक आहे. या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ५ मार्च पासून सुरू झालेली आहे. या प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी आतापर्यंत बालकाचे वय मर्यादा किमान ६ वर्ष व कमाल वय ६ वर्ष ११ महिने २९ दिवस होते. यामध्ये वाढ करण्याची मागणी पालकांकडून केली जात होती. त्यानुसार आता पहिलीतील प्रवेशासाठी बालकाची कमाल वय ७ वर्ष २ महिने २९ दिवस करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.राज्यभरातील ९ हजार १९४ शाळांमधील १ लाख १६ हजार ७७५ जागांसाठी आतापर्यंत २ लाख १३ हजार ८६२ अर्ज आले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्हयातून सर्वाधिक ४८ हजार ११५ अर्ज आले आहेत. पुणे जिल्हयात प्रवेशासाठी १६ हजार ५९४ जागा उपलब्ध आहेत.  पालकाला प्रवेश नोंदणी करताना १ किमी, ३ किमी व त्यापेक्षा अधिक अंतरातील फक्त १० शाळा निवडता येतील. परंतु प्रत्यक्ष एकच शाळेला प्रवेश मिळणार आहे. सदर कालावधीमध्ये पालकाने आपल्या पाल्याचे प्रवेश निश्चित करायचे आहे. अन्यथा पुढच्या फेरीत त्या पाल्याचा विचार केला जाणार नाही. कोणत्याही सबळ कारणाअभावी शाळेला प्रवेश नाकारता येणार नाही. 

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थीRight To Educationशिक्षण हक्क कायदा