Coronavirus in Maharashtra रत्नागिरी जिल्ह्यात रुग्ण संख्या झाली ८६; आणखी कोरोनाबाधित ४ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 06:56 PM2020-05-16T18:56:28+5:302020-05-16T18:59:47+5:30

यातील ३ रुग्ण कामथे तर १ रुग्ण कळंबणी येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. यामध्ये चिपळूण तालुक्यातील कापरे येथील ३ जण तर संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथील एका रहिवाशाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचे संख्या ८६ झाली आहे.

Increase of 4 more coronary patients in Ratnagiri district | Coronavirus in Maharashtra रत्नागिरी जिल्ह्यात रुग्ण संख्या झाली ८६; आणखी कोरोनाबाधित ४ रुग्णांची वाढ

Coronavirus in Maharashtra रत्नागिरी जिल्ह्यात रुग्ण संख्या झाली ८६; आणखी कोरोनाबाधित ४ रुग्णांची वाढ

Next
ठळक मुद्देमागील १० दिवसांमध्ये कोरोनाबाधित ८० रुग्ण वाढले असून, त्यापैकी ७५ रुग्ण मुंबई, ठाणे आणि पुणे येथील चाकरमानी आहेत

रत्नागिरी :    जिल्ह्यातील चिपळूण आणि संगमेश्वर येथे मुंबईतून आलेले ४ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८६ झाली आहे.

 

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हावासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य यंत्रणेवरील भार वाढत चालल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईकर मोठ्या प्रमाणात येत असल्याने जिल्ह्यात कोरोनाची पकड घट्ट होत चालली आहे. मागील १० दिवसांमध्ये  कोरोनाबाधित ८० रुग्ण वाढले असून, त्यापैकी ७५ रुग्ण मुंबई, ठाणे आणि पुणे येथील चाकरमानी  आहेत.

आतापर्यंत सापडलेले बहुतांश रुग्ण क्वारंटाईन करण्यात आलेले होते. शनिवारी जिल्हा रुग्णालयाला मिरज येथून ४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. ते चारही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ३ रुग्ण कामथे तर १ रुग्ण कळंबणी येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. यामध्ये चिपळूण तालुक्यातील कापरे येथील ३ जण तर संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथील एका रहिवाशाचा  समावेश आहे. त्यामुळे  कोरोनाबाधितांचे संख्या ८६ झाली आहे.

Web Title: Increase of 4 more coronary patients in Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.