शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा येथील घटना पूर्वनियोजित कटच होता : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 03:19 IST

कोरेगाव भीमा येथील घटना हा पूर्वनियोजित कट होता. या प्रकरणातील मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

पुणे : कोरेगाव भीमा येथील घटना हा पूर्वनियोजित कट होता. या प्रकरणातील मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. हल्ल्याशी नक्षलवाद्यांचा कोणताही संबंध नाही. यामुळे परिसरातील गावांमधील भयभीत सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना संरक्षण देण्याबाबत जिल्हाधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची चर्चा झाल्याचेही आठवले यांनी सांगितले.कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.याप्रसंगी पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आरपीआयचे नेते परशुराम वाडेकर, हणमंत साठे, बाळासाहेब जानराव आदी उपस्थित होते.आठवले म्हणाले, अ‍ॅट्रोसिटी कायद्यावरून मराठा समाजामध्ये काही गैरसमज निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरेगाव भीमा व परिसरातील गावांमध्ये अनुचित प्रकार घडला. त्यात संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भिडे व एकबोटे यांची छायाचित्र आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नाही; असा समज करून घेणे चुकीचे आहे.समिती स्थापन करावीछत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू येथील समाधीसाठी माझ्या खासदार निधीतून रक्कम देण्याची इच्छा आहे. त्याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. गोविंद महाराज यांच्याही समाधीस निधी दिला जाईल. संभाजी महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यामध्ये गोविंद महाराज होते किंवा नव्हते; याबाबत वढू ग्रामस्थांमध्ये संशय आहे. गोविंद महाराज हे संभाजी महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार करणाºया सेवेकºयांमध्ये होते, असा परंपरागत इतिहास चालत आलेला आहे, असेही आठवले यांनी सांगितले.प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यात आमचेही कार्यकर्ते सहभागी झाले होते. संविधानाला कोणीही हात लावू शकणार नाही. त्यामुळे संविधान बचाव रॅली काढणाºयांनी स्वत:चा पक्ष वाचविण्याचा विचार करावा. राजकारण करताना समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये.- रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावRamdas Athawaleरामदास आठवले